pune water supply issue in bhilarewadi mangdewadi gujar nimalkarwadi  Sakal
पुणे

Pune Water Supply : पाणीटंचाईने नागरिक हतबल; भिलारेवडी, मांगडेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडीतील परिस्थिती गंभीर

नव्याने समाविष्ट भिलारेवडी, मांगडेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी गावातील नागरिक पाणीटंचाईने हतबल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : नव्याने समाविष्ट भिलारेवडी, मांगडेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडी गावातील नागरिक पाणीटंचाईने हतबल झाले आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीस उन्हाचा कडाका वाढला असून तीव्र पाणीटंचाईमुळे पालिकेत समाविष्ठ झाल्यानंतरही काहीच उपयोग झाला नसल्याची भावना गावकऱ्यांमध्ये आहे.

ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा यंत्रणेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. पालिकेने गावात विविध ठिकाणी टाक्या बसवून टँकरने पाणी दिले जात आहे. तसेच, गाव विहिरीत टँकर टाकून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आले आहे.

दक्षिण पुणे परिसरातील नव्याने समाविष्ट गावांत बोअरवेल आणि विहिरीचे पाणी कमी झाल्याने गावातील पाणीटंचाई भीषण झाली आहे. नागरिकांना टँकरसाठी पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळा अजून किमान महिनाभर असून आतापासूनच तीव्र टंचाई झाल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत.

महापालिकेकडून टँकरने पुरवठा केला जात असून तेवढे पाणी पुरत नसल्याने, सोसायट्यांना स्वतः विकत पाणी घ्यावे लागत आहे. गुजर-निंबाळकरवाडी व भिलारेवाडी येथे जुने पाझरतलाव असून या तलावातील पाणी देखील कमी झाली आहे. समाविष्ठ गावातील गुजर-निंबाळकरवाडी, सोपानकाकानगर, भिलारेवाडी, मांगडेवाडी, सुंदरननगर आदी परिसरात मोठ्या पाणीपुरवठा वाहिनी नसल्याने पाणीपुरवठा होत नाही. परिणामी टँकरच्याच पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

- गुजर-निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, मांगडेवाडी परिसराची एकूण लोकसंख्या - अंदाजे ३० ते ३५ हजार

- एकूण सोसायट्या - १०० ते ११०

- एकूण सदनिका - २ ते अडीच हजार

- एकूण घरे - ७ ते ८ हजार

- एकूण कुटुंबे - अंदाजे १० ते १२ हजार

समाविष्ट गावात नागरीकीरण झपाट्याने वाढत आहे. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्या अनुषंगाने अतिरिक्त पाणी वाढून मिळावे अशी मागणी होत आहे. मिळणारे पाणी आणि मागणी यामध्ये यामध्ये तफावत होते. त्यामुळे काही भागात पाणी टंचाई तक्रारी येतात. नागरिकांच्या मागणीनुसार टँकर वाढवून देण्यात येणार आहेत.

-नितीन खुडे, उपअभियंता, पाणीपुरवठा

आमची गावे पालिकेत समाविष्ठ होऊन दोन वर्षे उलटून गेली. टँकरने पाणी ही तात्पुरती सुविधा असून पाण्याची मुख्य लाईन जोडून नियमित पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. मात्र, हे होताना दिसत नाही. त्यावर उपाययोजना करुन पाण्याची अडचण पालिकेने दूर करायला हवी.

- सुनिल मांगडे, नागरिक, मांगडेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माशी शिंकली…! IPL 2026 ला सुरुवात होण्यापूर्वीच CSK च्या स्टार खेळाडूने माघार घेतली, दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाला मुकणार

Mokhada News : थायलंडच्या सफेद जांभळाची चव आता मोखाड्यात... उच्च शिक्षित डॉ. सुमित ढाक या तरुणाचा अभिनव शेती प्रकल्प.

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पाचोर्‍यात भरधाव ट्रकने उडवले इलेक्ट्रिक पोल

Phulambri News : फुलंब्रीत गोवंश कत्तलीचा मोठा पर्दाफाश...पोलिसांचा छापा; आठ जनावरे जिवंत ताब्यात

Gold Rate Update : गुढीपाडव्याला महाराष्ट्रात सोनं कोसळलं! 2 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव आज; 1 तोळा कितीला विकलं जात आहे?

SCROLL FOR NEXT