Pune water supply issue two days Power outage of Bhama-Ascade scheme
Pune water supply issue two days Power outage of Bhama-Ascade scheme  sakal
पुणे

पुण्याचा पाणीपुरवठा दोन दिवसांपासून विस्कळीत; भामा-आस्केड योजनेचा वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा

लोहगाव : येरवडा, धानोरी, विमाननगर, वडगाव शेरी, टिंगरेनगर (विद्यानगर), कळस (विश्रांतवाडी) आदी भागाचा पाणीपुरवठा मागील दोन दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. भामा-आस्केड पाणीपुरवठा योजनेला विद्युत पुरवठा करणाऱ्या विद्युत केंद्रातील रोहित्राच्या भूमिगत विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने भामा-आस्केड धरणातून पूर्व पुण्याला होणारा पाणी पुरवठा बंद झाला व त्यामुळे वरील सर्व भागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला.

याबाबत माहिती देताना पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहायक अभियंता मधुकर थोरात म्हणाले, पुण्याला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या भामा-आस्केड पाणीपुरवठा योजनेचे विद्युत केंद्र या धरणापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे. या केंद्रातील रोहित्राच्या भूमिगत विद्युत वाहिनीत शुक्रवारी बिघाड झाला. हा बिघाड शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. शनिवारी (ता. २३) दुपारी हा बिघाड सापडला असून पालिकेचा विद्युत विभाग, महावितरण व पालिकेच्या ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारीच ही दुरुस्ती पूर्ण करून या योजनेतून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येईल. तसेच या योजनेच्या विद्युत पुरवठ्यासाठी धरण्याच्या दीड-दोन किलोमीटर परिसरात नव्याने रोहित्र बसवण्यात येणार असून हे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

दरम्यान वडगाव शेरीचा निम्मा भाग, येरवड्याचा निम्मा भाग व इतर काही भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारीच पर्यायी व्यवस्था करून सुरू करण्यात आला आहे. उर्वरित भागाचाही पाणीपुरवठा शनिवारी रात्रीपासून सुरू होईल, असे थोरात म्हणाले. तर नव्याने सुरू झालेल्या भामा-आस्केड पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा अल्प कालावधीतच विद्युत वाहिनीत बिघाड होऊन खंडित होण्याची बाब गंभीर आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी न मिळाल्याने नागरिकांचे मागील दोन दिवस चांगलेच हाल झाले. याबाबत प्रशासनाने त्वरित योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे प्रभाग एकच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT