Pune Water Supply those opposing installation of meters complained to police sakal
पुणे

Pune Water Supply : मिटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार

समान पाणी पुरवठा योजनेच काम रखडलेले असताना त्यात आता स्थानिक नागरिक मिटर बसविण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा

पुणे : समान पाणी पुरवठा योजनेच काम रखडलेले असताना त्यात आता स्थानिक नागरिक मिटर बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यासाठी महापालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे.

महापालिकेतर्फे समान पाणी पुरवठा योजनेचे काम २०१७ मध्ये सुरु केले. आत्तापर्यंत ६२ टक्के काम पूर्ण झालेले आहे. या योजनेतून सोसायट्या, बंगल्यांमध्ये ३ लाख १८ हजार पाणी मिटर बसविले जाणार आहेत. ज्या भागातील पाणी पुरवठा वितरणाच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले आहे अशा सोसायट्या, बंगल्यांना पाणी मिटर बसविण्याचे काम सुरु असून, आत्तापर्यंत १ लाख ३४ हजार ५८० मिटर बसवून झाले आहेत.

सध्या मध्यवर्ती पेठा, सहकारनगर, पर्वती, कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, कोथरूड, कर्वेनगर, वारजे आदी या भागात मिटर बसविण्याचे काम सुरु आहे. त्यामध्ये पेठा व सहकारनगर, कात्रज भागात पाणी मिटर बसविण्याच्या कामास स्थानिक राजकीय पदाधिकारी, त्यांचे कार्यकर्ते विरोध करत आहेत.

तसेच सोसायट्यांचे पदाधिकारीही विरोध करत आहेत. त्याबाबत पाणी पुरवठा विभागाने समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरीही विरोध कमी झालेला नाही. त्यामुळे त्याबाबत पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘‘समान पाणी पुरवठा योजनेचे ४० झोनचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. तेथे मिटर बसविणे अशी छोटी कामे शिल्लक आहेत. पण काही नागरिक मिटर बसविण्यास विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही पोलिस तक्रार करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT