pune weather forecast rain winter climate change fog and winter cold weather Esakal
पुणे

Pune Weather Update : हिवाळ्यात भरली पावसामुळे हुडहुडी; ढगाळ वातावरण, धुके अन् अंगाला झोंबणारी थंडी

राज्यात सोमवारी रात्रीपासून बहुतांश भागांत ढगाळ वातावरण तयार झाले. पुण्यात पहाटेपासून आकाश ढगाळ होते.

सकाळ वृत्तसेवा

Pune News: ढगाळ वातावरण, अधून-मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, धुके आणि अंगाला झोंबणारी थंडी असे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी अनुभवणारे वातावरण मंगळवारी (ता. ९) पुण्यात होते. कमाल तापमानाचा पारा चार अंश सेल्सिअसने कमी होऊन २४.८ अंश सेल्सिअस नोंदला गेला. त्यामुळे भरदिवसा जर्किन, स्वेटर, कानटोपी घालून पुणेकर घराबाहेर पडत होते.

राज्यात सोमवारी रात्रीपासून बहुतांश भागांत ढगाळ वातावरण तयार झाले. पुण्यात पहाटेपासून आकाश ढगाळ होते. साडेसात वाजल्यापासून अतिहलक्या सरींना सुरुवात झाली. त्याचवेळी दाट धुके शहरातील बहुतांश भागांत पडले होते.

सकाळी दहा वाजता पावसाचा जोर वाढला. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह सिंहगड रस्ता, कात्रज, वारजे, पाषाण, बाणेर, मगरपट्टा, फुरसुंगी भागांत पावसाच्या सरींना सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत हलक्या सरी पडत होत्या. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र गार हवा वाहू लागली.

का पडला पाऊस?

  • वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. तेथून थंड वाऱ्याबरोबर बाष्प महाराष्ट्राच्या दिशेने

  • बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत ढगाळ वातावरण

  • वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे येणारे थंड आणि बाष्पयुक्त वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे महाराष्ट्राच्या उत्तर भागात एकत्र

  • महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याला समांतर द्रोणीय स्थिती निर्माण

  • पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता

पावसाचा परिणाम काय झाला?

  • कमाल तापमानाचा पारा घसरला : शहरात सोमवारी कमाल तापमानाचा पारा ३०.३ अंश सेल्सिअस नोंदला होता. तो सरासरीपेक्षा १.३ अंश सेल्सिअसने वाढला. अवघ्या चोवीस तासांमध्ये कमाल तापमान २४.८ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. सरासरीपेक्षा ४.२ अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले.

  • दृश्‍यमानता कमी झाली : शहरात गेल्या चोवीस तासांमध्ये ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे दृश्‍यमानता कमी झाली. घाटमाथ्यावर दाट धुक्यामुळे वाहने चालविण्यात अडथळे आले.

  • आर्द्रता वाढली : शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८६ टक्क्यांपर्यंत वाढले.

कुठे किती पाऊस पडला?

  • शिवाजीनगर - १.६

  • पाषाण -२

  • लोहगाव - ३.६

  • लवळे -४.५

  • मगरपट्टा - १३

  • चिंचवड -६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: कचरा संकलनासोबत कर वसुलीवरही नजर; नव्या कंपनीला महापालिका आयुक्तांच्या सूचना

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Ahilyanagar News: अहिल्यानगर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ९८६ कोटी थकीत; ठेकेदार आर्थिक अडचणीत, २० टक्केच निधी प्राप्त!

Chhatrapati Sambhajinagar: एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेत ६९.३३ टक्के उपस्थिती; स्पर्धा परीक्षा;शहरातील ३६ केंद्रांवर ३ हजार ५६९ उमेदवारांची दांडी.

Chhatrapati Sambhajinagar: दुकानातील अंगठी बोटात घालून पळण्याचा प्रयत्न; जयभवानीनगर परिसरातील घटना, अल्पवयीन मुलाला तातडीने पकडले.

SCROLL FOR NEXT