Pune Weather sakal
पुणे

Pune Weather : पुण्यात थंडी वाढली ; किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत

शहरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा किमान तापमानाचा पारा १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शहर आणि परिसरात सोमवारी (ता. २६) आकाश ढगाळ राहणार असल्याने थंडीचा कडाका कमी होऊन किमान तापमानाचा पारा पुन्हा उसळी घेईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी वर्तविण्यात आला.

शिवाजीनगर येथील वेधशाळेत या महिन्याच्या पहिल्याच दिवशी किमान तापमान १०.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. त्यानंतर किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत गेला. पुणे शहरात १६ फेब्रुवारीला १६.५ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान वाढले होते. त्यादरम्यान वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आणि बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे शहराच्या परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडीने शहरातून काढता पाय घेतला होता.

रथसप्तमीनंतरदेखील थंडी कमी होऊ लागली होती. मात्र, उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हिमवर्षाव सुरू झाला आहे. तेथून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होत आहे. राज्यातील पुण्यासह बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली घसरला असल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात पहाटे गारठा आणि दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नीचांकी पाच अंश तर सोलापूर येथे उच्चांकी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यातच येत्या सोमवारी (ता. २६) विदर्भात वादळी पावसासह गारपीट होण्याचा इशारा (ऑरेंज अलर्ट) तर मराठवाड्यात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामानात वेगाने बदल होत आहेत. निफाड, धुळ्यासह मध्य महाराष्ट्रात दोन दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे.

२४ तासांत वाढला गारठा

शिवाजीनगर वेधशाळेत शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमानाचा पारा १२.८ अंश सेल्सिअस नोंदला होता. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हे तापमान १०.९ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले. अवघ्या चोवीस तासांमध्ये १.९ अंश सेल्सिअसने किमान तापमान कमी झाल्याने हवेतील गारठा वाढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chandrakant Patil : चंद्रकांत दादांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला; “तिजोरीची चावी दुसऱ्याकडे, पण तिजोरीचा मालक आमचाच”

Ladki Bahin Yojana: नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार? लाडक्या बहि‍णींना लागणार लॉटरी?

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर

'धनंजय मुंडेंसारखा विचित्र माणूस पृथ्वीतलावर नाही'; वाल्मीक कराडची आठवण काढणाऱ्या मुंडेंवर जरांगेंची सडकून टीका

Ethiopia Volcano Ash : मुंबई अन् दिल्लीपर्यंत पोहोचली इथोपियातील ज्वालामुखीची राख; अनेक विमानांची उड्डाणे रद्द, अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT