Pune Rain News Sakal
पुणे

Pune Rain News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला गारपिटीच्या पावसाने झोडपले

शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला

सकाळ वृत्तसेवा

- सागर रोकडे

पाबळ : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील टाकळी हाजी, पाबळ, कवठे येमाई, सविंदणे, वडनेर खुर्द, फाकटे, चांडोह, निमगाव दुडे या परिसरातील गावांमध्ये रविवारी (ता.२६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट, मेघगर्जना, गारपिटीसह मुसळधार पाऊस बरसला.

अचानक आलेल्या अवकाळी गारपिटीच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक ठिकाणी कौलारू घरांची कौले फुटली. शेतात व अंगणात सर्वत्र गारांचा खच पाहायला मिळाला. वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली.

गारपिटीसह झालेल्या पावसाचा कांद्याची रोपे, मका, चारा पिके, गहू, ज्वारी, हरभरा, फ्लॉवर, कोबी या पिकांसह फळझाडांना मोठ्या प्रमाणात फटका बसला असून उभी पिके भुईसपाट झाली आहे.

कांदा लागवडीसाठी आलेली रोपे भुईसपाट झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. सर्वाधिक फटका कोथिंबीर, मेथी, शेपू यांसारख्या भाजीपाला पिकांना बसला असून शेतात पाणी साचल्यामुळे भाजीपाला पिके शेतातच सडून जाणार असल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

"गारपिटीने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हजारो रूपयांचे बियाणे घेऊन कांदा लागवडीसाठी टाकलेले रोपे सडून जाणार आहे. शासनाने नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी."

- दत्तात्रय चौधरी शेतकरी

"गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे स्थळ पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांना देण्यात आल्या आहेत. पंचनामे करुन नुकसान भरपाईसाठी अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे."

- बाळासाहेब म्हस्के तहसीलदार, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT