pune Weather Update rain Heat wave warning in Konkan sakal
पुणे

Weather Update : पावसासाठी पोषक हवामान; कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

पुणेकरांना आता पुन्हा उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका मिळण्याची शक्यता आहे

अक्षता पवार

पुणे : पुणेकरांना आता पुन्हा उन्हाच्या झळांपासून काहीशी सुटका मिळण्याची शक्यता आहे. शहर व परिसरात पुढील दोन दिवसानंतर मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सध्या पश्‍चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात तसेच शहरात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

पुण्यात या आठवड्याच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावत उन्हाच्या चटक्यांपासून नागरिकांची सुटका केली होती. जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे आणि पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली होती.

त्यानंतर मात्र पावसाचे वातावरण निवळल्या नंतर पारा पुन्हा चढू लागल्याचे चित्र मागील दोन ते तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. शुक्रवारी (ता. ११) शहरात १५.८ अंश सेल्सिअस किमान आणि ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार येत्या मंगळवारपासून (ता. १४) शहर व परिसरात ढगाळ वातावरणाची तसेच दुपारनंतर विजांसह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे. राज्यात पावसासाठी पोषक वातावरण होत असून शनिवारी (ता. ११) कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. शुक्रवारी देखील कोकणात काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली होती. राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद सांताक्रूझ येथे ३७.५ अंश सेल्सिअस झाली. तर नीचांकी तापमान छत्रपती संभाजीनगर येथे १३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. शनिवारी (ता. ११) उष्णतेच्‍या लाटेचा इशारा ः पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Skill University Bill: ग्रामीण रोजगाराला मोठा बूस्ट! कौशल्य विद्यापीठ विधेयक परिषदेत मंजूर; लातूर-पुण्यात नवे विद्यापीठ उभारणार

CJI Surya Kant: चक्क सरन्यायाधीशांच्या भावालाच केला फोन; सीजेआय म्हणाले, जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी सोडणार नाही...

Lord Ram Descendants : कोण आहेत प्रभू श्रीरामाचे वंशज? आता कुठे आहेत अन् कशा परिस्थितीत जीवन जगतात? पाहा

खरातचा पत्रकाराच्या हत्येशी संबंध असल्याचा आव्हाडांचा दावा, २ आरोपींचा मृत्यू; आरोपींच्या काकांनी दावे फेटाळले

वैभव सूर्यवंशीने CSK ला दिलं आव्हान; Dhoni च्या संघाला मागील पर्वात दोन्ही सामन्यांत हरवलं होतं, IPL 2026 मध्येही...

SCROLL FOR NEXT