Pune Rain
Pune Rain Sakal Digital
पुणे

Pune Rain : दोन तासांत का पडला मुसळधार पाऊस? हवामान विभागाचं उत्तर

योगिराज प्रभुणे

Pune Rain Update

पुणे : विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी रात्री शहराला पुन्हा अक्षरशः बुडविले. पुणे शहरातील गल्लीबोळांसह प्रमुख रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले होते. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, सखल भागांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. रात्री साडेनऊ ते साडेदहा या दोन तासांमध्ये ८१ मिलिमीटर पाऊस शिवाजीनगरमध्ये नोंदला गेला.

पुणे शहरा दिवसभर अंशतः ढगाळ वातावरण होते. उन्हाचा चटका वाढला होता. त्यामुळे हवेतील उकाडाही वाढल्याचे जाणवत होते. रात्री साडेनऊ वाजल्यानंतर शहरातील अचानक तुफान पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर इतका भयंकर होता की, काही वेळेतच रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागले. रात्री साडे दहा वाजल्यानंतर पावसाचा जोर आणखी वाढला. रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले. रात्र असल्याने शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली होती. भांडारकर रस्ता, मार्केटयार्ड, कोंढवा, कर्वे रस्ता, शिवाजीनगर, येरंडवणे, बी. टी. कवडे रस्ता, पाषाण, सूस, आंबेगाव, दत्तवाडी शहरातील मध्यवस्तीतील पेठा या भागात पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने तळ्याचे स्वरूप आले होते. सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण पुलापासून ते कात्रज चौकापर्यंत रस्त्यावरील सर्व वाहतूक पावसामुळे ठप्प झाली.

रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचा तोल जात होता. या वेगामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या दुचाकी वाहून गेल्याच्या घटना शहरात घडल्या, अशी माहिती चंद्रकांत सणस यांनी दिली.

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या माणिक नाला, नागझरी, आंबिल ओढा, दुथडी भरून वाहत होते. या नाल्याच्या कडेने राहणाऱ्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

१२ किलोमीटरचा ढग

पुणे शहर आणि परिसरावर १२ किलोमीटर उंचीचा ढग रात्री असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘हा ढग रात्री पुण्यावर जात होता. तो ज्या भागातून पुढे सरकला त्या भागात मुसळधार सरी पडला.’’

का पडला मुसळधार पाऊस?

सकाळी उन्हाचा चटका वाढला. त्याच वेळी हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले. त्यामुळे मोठ्या उंचीचे ढग शहर आणि परिसरात आले. त्यातून रात्री मुसळधार पाऊस पडला.

काय काय झाले?

- शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाणी शिरले

- टिळक चौकातील दुकानांना पाण्याचे लोंढे धडकले

- कात्रज, येवलेवाडी स्मशानभूमी, उंड्री, पिसोळी, हडपसर, बिबवेवाडी, सुखसागर सिंहगड रस्ता, धायरी, एनआयबीएम रस्ता पावसाने धुमाकूळ घातला

- आंबेगाव, दत्तनगर, जांभूळवाडी, बिबवेवाडी, बी. टी. कवडे रस्ता या भागात रात्री अकरा वाजता वीज पुरवठा खंडित झाला.

- नाना पेठेतील अशोक चौक

- रेल्वे स्थानकासमोरील तुकाराम शिंदे वाहनतळ आणि भुयारी मार्गातील दुकानांमध्ये पाणी शिरले.

- हडपसरमध्ये झाड कोसळले

असा पडला पाऊस

हडपसर.... ६१

वडगाव शेरी .... ५८

हवामान अंदाज

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात दिवसा उन्हाचे चटके तर रात्री जोरदार पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. हे चित्र पुढील दोन दिवस असेच कायम राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. सोमवारी रात्री पावसाने धुवाधार बॅटिंग केली. त्यामुळे आता दिवाळीत पावसाचे सावट कायम राहतील का अशी शंका पुणेकरांच्या मनात उमटू लागली आहे. पुढील दोन ते तीन दिवस शहरात असेच चित्र कायम राहणार असून येत्या गुरुवारपर्यंत (ता. २०) पुणे व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते. दुपारनंतर मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पुण्यातून मॉन्सून परतण्यासाठी आणखीन काही दिवसांचा अवकाश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

SCROLL FOR NEXT