pune weather update record of high temperature in last 10 years in morning 27 3 degree imd Sakal
पुणे

Pune Weather Update : पुण्यात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक उकाडा

बुधवारी सकाळी २७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

Pune News : शहरात बुधवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमान २७.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे गेल्या १० वर्षांतील सर्वांत उच्चांकी किमान तापमान ठरले आहे. त्यामुळे पुण्यात सर्वाधिक उकाडा असलेली मंगळवारची रात्र ठरली. सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने किमान तापमान वाढले असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.

पुण्यात मंगळवारी ४०.३ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमानाच्या पाऱ्याने उसळी मारली होती. परिणामी, रात्रीही उकाडा वाढला होता. बुधवारी कमाल तापमान ३८.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सरासरीपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते.

कमी पाऊस आणि प्रशांत महासागरातील उष्ण पाण्याचा प्रवाह असलेल्या ‘एल निनो’मुळे यंदा उन्हाचा चटका वाढला आहे. त्याचबरोबर रात्रीचा उकाडाही वाढल्याची माहिती हवामान खात्याने दिली. यंदा पुण्यात उन्हाच्या झळा जास्त प्रमाणात अनुभवायला मिळाल्या. एप्रिलमध्ये कडक उन्हाचा अनुभव घेतल्यानंतर मे महिन्याची सुरुवातही काहीशी उष्ण होती.

मात्र शहरात १० मेनंतर पडलेल्या वळवाच्या सरींनी काही अंशी गारवा निर्माण झाला होता. या काळात दिवसा गरम, दुपारी ढगाळ वातावरण आणि पाऊस असा अनुभव पुणेकर घेत आहेत. अशातच हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे दिवस आणि रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

दिवसा वाढलेले तापमान, हवेतील आर्द्रता आणि ढगांच्या निर्मितीमुळे उष्णतेचे परावर्तन न होता, ती जमिनीत तशीच साठून राहते. त्यामुळे रात्रीच्या तापमानात लक्षणीय वाढ होते. दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री उकाडा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र पंखे, एसी आणि कुलर सुरू असल्याचे दिसते.

उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’

पुणे जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कमाल तापमानाचा पारा ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस नोंदले जाईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

का वाढला उन्हाचा चटका?

देशाच्या वायव्य भागात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तेथून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात पुण्यासह इतर भागांत उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस याचा प्रभाव कायम राहील, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

२४ तासात आरोपी ताब्यात! बाहेरच्या टॅक्सी चालकाला लोणावळ्यात मारहाण; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

Kolhapur news: मुदाळतिट्टा चौकात वाहतूक कोंडीचा महापूर! वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि प्रवाशांचा त्रास शिगेला

Shrikant Shinde: शिवसेनेला शक्ती प्रदर्शनाची गरज नाही, अंबरनाथमध्ये भगवा ठाम; श्रीकांत शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

शुभमन गिलचं साराशी लग्न कधी? चाहत्याने थेट वडिलांनाच विचारला प्रश्न, Video तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT