Pune Weather Update:  sakal
पुणे

Pune Weather Update: पुणेकरांनो सावधान! उद्या पुण्यात कसा असेल पाऊस? पावसाचे अपडेट्स वाचल्याशिवाय घराबाहेर पडू नका!

Pune Weather Update | कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडत आहेत.

सम्राट कदम

Pune Weather Update: जिल्ह्याचा घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. शुक्रवारी (ता.२६) देखील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ तर पुणे शहरासह पूर्वेकडील भागात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ हवामान विभागाने दिला आहे. हवेतील आद्रता आणि पावसामुळे दृष्यमानता घटण्याची शक्यता आहे.

बुधवारी (ता.२४) रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पुर आला असून, बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नदीकाठ व सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.

पुढील दोन दिवस पावसाची संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता.२५) सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा पर्यंत शिवाजीनगर येथे ५१.३ मिलिमीटर, चिंचवड येथे ६८ मिलिमीटर तर लोणावळ्यात ११७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्हात सर्वात कमी पाऊस बारामती येथे १५.२ मिलिमीटर नोंदविला गेला. जिल्ह्याच्या पूर्व भागाच्या तुलनेत घाटमाथ्याकडे पावसाचा जोर जास्त आहे. राज्यातही मॉन्सून सर्वदूर सक्रिय झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असून, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडत आहेत.

पावसाला वाऱ्यांची जोड ः

पश्‍चिम बंगाल, बांगलादेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या गंगानगर पासून, जयपूर, ग्वालेर, सिधी, रांची, कॅनिंग ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, गुजरात, मध्य प्रदेशातून पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय असल्याने महाराष्ट्रासह पश्‍चिम किनाऱ्यावर पावसाने जोर धरला आहे.

गुरुवारी ६ पर्यंतचे पर्जन्यमान (मिमी)

लोणावळा ः ११७

लवासा ः १०४

लवळे ः ७४.५

चिंचवड ः ६८

तळेगाव ः ६३

पाषाण ः ५६.२

राजगुरुनगर ः ४४.५

हडपसर ः ३३.५

दौंड ः १९

नारायणगाव ः १८.५

बारामती ः १५.२

-----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT