Pune Weather sakal
पुणे

Pune Weather : पुण्यात शाळेसह पावसाचीही बुट्टी;दिवसभरात एकही सर नाही, कमाल तापमान तीसच्या घरात

जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बारावीपर्यंतच्या शाळांना मंगळवारी (ता. ९) सुट्टी जाहीर केली. मात्र शाळांबरोबर पावसानेही सुट्टी घेतली. शहरात दिवसभरात पावसाची एकही सर पडली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी बारावीपर्यंतच्या शाळांना मंगळवारी (ता. ९) सुट्टी जाहीर केली. मात्र शाळांबरोबर पावसानेही सुट्टी घेतली. शहरात दिवसभरात पावसाची एकही सर पडली नाही. शहर आणि परिसरात सोमवारी (ता. ८) दुपारनंतर पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला होता, तो रात्री उशिरापर्यंत कायम होता. याच दरम्यान हवामान विभागाने मंगळवारी घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला. शहरातही पावसाच्या मध्यम सरी पडतील, असे नमूद केले होते. पावसामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आपत्कालीन स्थितीचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये, यामुळे डॉ. दिवसे यांनी जिल्ह्यातील इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर केली.

महापालिकेच्या शाळांनाही आदेशाच्या आधारे सुट्टी दिली. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या पालकांना मंगळवारच्या सुट्टीची माहिती कळविली. परंतु मंगळवारी पावसानेही सुट्टी घेतली. शहरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगाळ वातावरण कमी होऊन सूर्यकिरणे पडली होती. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा २९.४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला होता.

हवामान अंदाज

बुधवार (ता. १०) : आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला.

हवामान विभागाने पुणे शहर व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवूनही मंगळवारी (ता. ९) दिवसभर विश्रांती घेतली. यामुळे हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला. दिवसभरात घाटमाथा आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा पावसाने हजेरी लावली नसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी (ता. ८) सकाळी आठपासून मंगळवारी (ता. ९) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत शहर व जिल्ह्यात २०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जुलैमधील तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पुणे शहर ः ३७.३

हवेली ः ४६.२

मुळशी ः २२०.९

भोर ः १५८.१

मावळ ः २१४.२

वेल्हे ः ३४९.५

जुन्नर ः ५८.०

खेड ः ३८.१

आंबेगाव ः ११७.२

शिरूर ः १९.१

बारामती ः १६.५

इंदापूर ः ४६.४

दौंड ः ३८.२

पुरंदर ः ३१.०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT