marriage. 
पुणे

मयतीलाही मिळेना नवा कपडा! पुणे ग्रामीण भागातील अनेकांच्या लग्नाची खरेदी रखडली

सकाळवृत्तसेवा

पुणे : लग्नाची तारीख काढली. मंगल कार्यालये बुक केले आणि पत्रिकाही छापल्या. पण लग्नासाठी आवश्‍यक असलेले कपडे, सोने, भांडी-बासने आदींची खरेदी राहिली. तितक्यात सरकारने मिनी लॉकडाऊन लागू केले. त्यामुळे आता लग्नाची खरेदी करायची कशी, असा प्रश्‍न पुणे शहरातील उपनगरे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. त्यातच कारवाईच्या भीतीने मंगल कार्यालयांनी नोंदणी रद्द केली आहे. उपनगरांमध्ये मयतीलाही नवा कपडा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे केवळ खरेदीअभावी अनेकांना नाइलाजाने का होईना, लग्नाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या असल्याचे येवलेवाडी-कोंढवा येथील दीपक दहिफळे यांनी सांगितले. उपनगरे आणि ग्रामीण भागात इमारतींची बांधकामे चालू ठेवण्यास परवानगी दिली. पण बांधकामासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी आवश्‍यक असलेली हार्डवेअरची दुकाने बंद आहेत. त्यामुळे बांधकामासाठीचे साहित्य आणि स्टील खरेदी करता येत नसल्याचेही दहिफळे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांमध्ये उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड येथील मजुरांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परंतु लॉकडाऊनच्या भीतीने हे मजूर मोठ्या संख्येने आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. त्यामुळे बांधकाम साहित्य आणि मजुरांअभावी ग्रामीण भागातील सुमारे ७० टक्के बांधकामे बंद आहेत. ग्रामीण भागात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. यामुळे घरातील उकाडा वाढला आहे. यासाठी पंखे दुरुस्ती, नवीन पंखे बसविणे, त्यासाठी पंख्यांची खरेदी करणे आदी कामे ठप्प झाली आहेत. यामुळे नागरिक उकाड्याने हैरान झाले आहेत. ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांची संख्या मोठी आहे. या निरक्षर नागरिकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे त्यांना आॅनलाइन मोबाईल रिचार्ज करता येत
नाही.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मागच्या दाराने होतेय खरेदी

दरम्यान, मंगल कार्यालयांनी नोंदणी रद्द केली असली तरी, काही नागरिक आपापल्या पाल्यांचे लग्न नियोजित तारखेलाच करू लागले आहेत. यासाठी रात्रीच्यावेळी मागच्या दाराने दुकानात प्रवेश करून कपडे आणि सोने खरेदी करू लागले आहेत. यासाठी बंद दुकानासमोर एक कामगार बसवून, त्याच्यामार्फत इच्छुक ग्राहक हेरले जात आहेत. या ग्राहकांचा संपर्क क्रमांक घेऊन, त्यांना खरेदीसाठी रात्री बोलावून घेण्यात येत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

ग्रामीण भागातील प्रमुख अडचणी

  • - हार्डवेअर दुकाने बंद असल्याने बांधकाम साहित्य मिळेना
  • - शेतीउपयोगी साहित्य खरेदी करता येईना.
  • - रिचार्जअभावी अनेकांचे मोबाईल बंद पडले.
  • - इलेक्ट्रिकल दुकाने बंदमुळे पंखे दुरुस्त करता येईनात.
  • - नवीन पंखेही खरेदी करता येईनात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT