Rajiv Gandhi Zoo Sakal
पुणे

पुणे : प्राणिसंग्रहालय कधी होणार सुरू?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रजचे स्वर्गीय राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद आहे. पुणे महापालिकेने शहरातील काही उद्याने खुली केली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कात्रज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कात्रजचे स्वर्गीय राजीव गांधी प्राणिसंग्रहालय बंद आहे. पुणे महापालिकेने शहरातील काही उद्याने खुली केली आहेत. मात्र, त्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय कधी सुरू होणार, असा प्रश्न शहरातील नागरिक, पर्यटकांकडून केला जात आहे. प्राणिसंग्रहालयाला भेट देण्याऱ्यांची संख्या सध्या वाढत आहे.

सुटीच्या दिवशी तर गेटसमोर गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र पर्यटकांची निराशा होत आहे. खास करून बच्चे कंपनीचे मुख्य आकर्षण असलेले हे प्राणी संग्रहालय पाहता न आल्याने लहानग्यांचा हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरे, हॉटेल, उद्याने खुली झाली आहेत. मात्र प्राणिसंग्रहालयाला परवानगी दिली नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्राणिसंग्रहालयही खुले करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

मी पिंपरी चिंचवडमधून कुटुंबासह प्राणिसंग्रहालयात आलो होतो. पण, येथे आल्यावर निराशा झाली आहे. उद्यान बंद असून गेटवरील सुरक्षारक्षकाने दिवळीनंतर सुरू होणार असल्याचे सांगितले. प्रशासनाने नियम घालून लवकर प्राणिसंग्रहालय सुरू करावे.

- नितीन वेल्हाळ, पर्यटक

शासनाने कोणतेही प्राणिसंग्रहालय खुले करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. जोपर्यंत आदेश येत नाही, तोपर्यंत प्राणिसंग्रहालय खुले करण्यात येणार नाही. त्यामुळे लोकांनी उद्याने खुली झाली आहेत असे समजून प्राणिसंग्रहालयासमोर गर्दी करू नये

- ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT