crime news Sakal
पुणे

पुणे : मुलावर ओरडली म्हणून पत्नीला पायरीवरून ढकलले

लहान मुलाने मस्ती केल्याने त्यावर ओरडली म्हणून पतीने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तिला पायरीवरून ढकलून दिले. हा प्रकार सातवनगरमध्ये घडला.

सकाळ वृत्तसेवा

लहान मुलाने मस्ती केल्याने त्यावर ओरडली म्हणून पतीने पत्नीला लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच तिला पायरीवरून ढकलून दिले. हा प्रकार सातवनगरमध्ये घडला.

पुणे - लहान मुलाने (Child) मस्ती केल्याने त्यावर ओरडली (Shouted) म्हणून पतीने (Husband) पत्नीला (Wife) लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण (Beating) केली. तसेच तिला पायरीवरून ढकलून (Pushed) दिले. हा प्रकार सातवनगरमध्ये घडला. याबाबत २७ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्यांवर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीच्या गुडघ्याला व अंगाला मुका मार लागला आहे. सातवनगर-हांडेवाडी रस्ता येथे २५ फेब्रुवारी २०१२ ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान हा प्रकार घडला. पती कुणाल शांताराम कचरावत, सासू लंका शांताराम कचरावत, दीर रामदास शांताराम कचरावत आणि जाव पार्वती रामदास कचरावत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सासरी नांदत असताना पतीने शारीरिक आणि मानसिक त्रास देत वेगवेगळ्या कारणासाठी पैशाची मागणी करून पत्नीचा छळ केला. मारून टाकण्याची धमकी देऊन क्रूर वागणूक देत जाच केल्याने तिला जगणे असह्य केले.

२७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता फिर्यादी यांच्या लहान मुलाने मस्ती केल्याने फिर्यादी त्यावर ओरडल्या. त्यामुळे पतीने त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत पायरीवरून पडल्याने गुडघ्याला व अंगाला मुका मार लागला. वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

नातेवाईकांनी दाबला गळा -

पतीच्या नातेवाईकांनी ‘तू मरून जा नाही तर आम्ही तुला सोडणार नाही,’ असे म्हणत फिर्यादी यांच्या अंगावर सुरू घेऊन धावून येत गळा दाबला. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध पडल्या. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला, असे वाटल्याने आरोपींनी फिर्यादी यांना बेडरूममध्ये आणून टाकले, असे फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT