Gun Firing Sakal
पुणे

Pune News : लग्नानंतर आठवडाभरातच कारागृह कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या

लग्नानंतर आठवडाभरातच कारागृहातील एका पोलिस कर्मचाऱ्याने बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लग्नानंतर आठवडाभरातच कारागृहातील एका पोलिस कर्मचाऱ्याने बंदुकीने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या कारागृह कर्मचाऱ्याने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याबाबत एका महिलेसह सहाजणांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल मुरलीधर माने (वय २८) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. येरवडा कारागृहात २७ फेब्रुवारी ही घटना घडली होती. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक भगवान सदाशिव गुरव यांनी फिर्याद दिली आहे.

पल्लवी दिनकर धुमाळ (रा. येरवडा कारागृह वसाहत), दिनकर रंगोबा धुमाळ (वय ५७, रा. विजय पार्क, विद्यानगर), प्रतीक दिनकर धुमाळ, रोहिदास मुरलीधर निगडे (वय ५२), सोहम निगडे, रोहित साहु लॅबवाला अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवीने अमोल याला विवाहास नकार दिला होता. पल्लवी आणि नातेवाईकांनी अमोलला धमकावण्यास सुरवात केली. तुझ्याविरुद्ध तक्रार केल्यास निलंबित होईल, अशी धमकी त्याला दिली होती.

दरम्यान, अमोलने जानेवारी महिन्यात दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. विवाहानंतर तो पुन्हा कारागृहात रुजू झाला. परंतु पुन्हा पल्लवी आणि नातेवाईकांनी त्याला बदनामी करण्याची धमकी दिली होती.

त्यानंतर अमोल याने २७ फेब्रुवारी रोजी कारागृहात पहाटे बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाईलवर संदेश लिहिला होता. त्यावरून पोलिसांनी तपास करुन सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT