मजुराचा मृत्यु sakal
पुणे

पुणे : बांधकामाच्या ठिकाणी वीट डोक्‍यात पडल्याने महिला मजुराचा मृत्यु

ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम सुरू असतानाच मालवाहू लिफ्टच्या बकेटमधील वीट डोक्‍यात पडल्याने महिला मजुर गंभीर जखमी झाली होती. महिलेवर उपचार सुरू असताना मृत्यु झाला. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हि घटना 28 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कात्रज येथील संतोष नगर परिसरात घडली.

अंजुबाई नारायण पवार (वय 27, रा. संतोषनगर, कात्रज) असे मृत्यु झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार अनिल भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील संतोषनगर येथे समर्थ अपार्टमेंट नावाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथे अंजुबाई पवार या बिगारी म्हणून काम करीत होत्या. 28 सप्टेंबरला दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या वरच्या मजल्यांवर मालवाहू लिफ्टमधून वीटा पोचविण्याचे काम करीत होत्या. लिफ्टमध्ये वीटा भरून त्या बाजुला जात असतानाच बकेटमधील एक वीट अंजुबाई यांच्या डोक्‍यात पडली. त्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला. ठेकेदाराने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणतीही साधने न ठेवता निष्काळजीपणा करून महिलेच्या मृत्युस कारणीभुत ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT