Crime_Rape 
पुणे

पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवत वेगळं राहणाऱ्या पत्नीवर पतीचा बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कौटुंबिक वादामुळे विलग राहणाऱ्या पत्नीवर हॉटेल व्यावसायिक पतीनेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन पिस्तुलाचा धाक दाखवित लैंगिक अत्याचार केला. तसेच पत्नीने पतीविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारी मागे न घेतल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी पतीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश बलभीम लोंढे (रा. टेंभुर्णी, करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने लोंढेविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आकाशचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाले. त्यामुळे पत्नी पतीपासून वेगळी राहात होती. या दरम्यान फिर्यादीने पतीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याबरोबरच इंदापूर येथील न्यायालयात त्यांच्यात घटस्फोट घेण्याबाबतचे प्रकरण प्रलंबित होते. दरम्यान, पतीने 8 जानेवारीला पत्नीला जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून वडगाव बुद्रुक येथील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवित 'माझ्या आड येऊ नकोस, नाहीतर तुला संपवून टाकेन' अशी धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर तिला टेंभुर्णी येथे नेऊन तिच्याशी पुन्हा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या घटनेमुळे प्रचंड धक्का बसल्याने फिर्यादीची मानसिक स्थिती बिघडली होती. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेतल्यानंतर तिने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक संगीता यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाधर घावटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT