Pune News 
पुणे

Pune News : नवरा वेळ देत नाही, बायकोने थेट IT कंपनीला दिली बॉम्ब ठेवल्याची धमकी...

Sandip Kapde

Pune News : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पती वेळ देत नाही म्हणून पत्नीने अजबच कृत्य केल आहे. चंदननगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेने एका आयटी कंपनीला बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

पती एका आयटी कंपनीत नोकरीला आहे. पण तो कामात व्यस्त असतो. वेळ देत नाही म्हणून पत्नी वैतागली होती. यामुळे तिने नामी शक्कल लढवली. महिलेने पतीच्या इमेलवरुन कंपनीला बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली.

धमकी देणारी महिला कोंढवा येथील एका खासगी कोचिंग संस्थेत इंग्रजी शिक्षिका म्हणून काम करते. तिचे पती आयटी इंडस्ट्रीत कर्मचारी आहेत. मात्र, पतीने धमकीच्या ईमेलमध्ये नमूद केलेल्या कंपनीतील नोकरी नुकतीच सोडली आहे. (Pune Crime News)

आयटी कंपनीत बॉम्ब असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या ईमेलमुळे पोलिसांनी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी ईमेलमध्ये पतीचा फोन नंबर सापडला होता.

पोलिसांनी ईमेलचा आयपी अड्रेस शोधून काढला. धमकीचा मेला पतीच्या टॅबलेटवरून आला होता. चौकशीदरम्यान आरोपी महिलेने ईमेल पाठवल्याचे मान्य केले. पतीला धडा शिकवण्यासाठी बॉम्बची धमकी दिल्याचे महिलेने कबूल केले. (Pune Police)

महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याविरुद्ध कलम ५०६ (२) आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT