Court esakal
पुणे

Marriage : घटस्फोट न घेता केलेले महिलेचे दुसरे लग्न रद्दबातल

पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरे लग्न करणाऱ्या महिलेचे लग्न न्यायालयाने रद्दबातल केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरे लग्न करणाऱ्या महिलेचे लग्न न्यायालयाने रद्दबातल केले आहे.

पुणे - पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरे लग्न करणाऱ्या महिलेचे लग्न न्यायालयाने रद्दबातल केले आहे. फसवणूक करून लग्न केले म्हणून लग्न रद्दबातल करण्यासाठी पतीने न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज मान्य करीत न्यायालयाने हा निकाल दिला.

सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) के. एस. नावंदर यांनी हा आदेश दिला. पत्नीने किंवा तिच्यावतीने इतर कुणीही साक्ष नोंदविली नाही. त्यामुळे पतीची फसवणूक केल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने पत्नीविरूद्ध एकतर्फी निकाल देत हे प्रकरण निकाली काढण्यात आले. रत्ना आणि कुणाल (नाव बदललेली) असे या जोडप्याचे नाव आहे. त्यांचे चार जून २०२१ ला आळंदी येथे लग्न झाले होते. कुणाल हे पोलिस दलात कार्यरत आहेत. तर रत्ना ही गृहिणी आहे. कुणाल यांचे लग्न झालेले होते.

मात्र त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. कुणाल यांना एक मुलगी आहे. ३० वर्षीय कुणाल यांनी मुलीसाठी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी रत्ना यांच्याशी लग्न केले. लग्नापूर्वी कुणाल यांनी रत्ना यांना पूर्वीचे लग्न, मुलगी, त्यांचे आई-वडील यांच्याविषयी माहिती दिली होती. लग्नानंतर नऊ दिवसांतच त्यांच्यात भांडण झाले व ती माहेरी निघून गेली. तिला शोधल्यानंतर ती आंबेगाव नऱ्हे येथे सापडली. रत्ना किरकोळ कारणांवरून भांडण करीत. मुलीलाही वाईट वागणूक देत. तसेच तीने वेगळे राहण्याचा तगादा लावला होता, असे निकालात नमूद आहे.

दरम्यान कुणाल यांना रत्नाचे आधीच लग्न झाले असून तिचा पती मध्य रेल्वेत कामाला आहे. त्यांचा अद्याप घटस्फोट झालेला नाही. तिने पहिल्या पतीच्या कुटुंबावर घटले दाखल केले आहेत, अशी माहिती समजली. त्यामुळे त्यांनी हे लग्न रद्दबातल करण्यासाठी ॲड. नीता भवर यांच्यामार्फत अर्ज केला होता. पत्नीने न्यायालयात हजर राहून तिचा बचाव सादर केला नाही. त्यामुळे न्यायालयाने एकतर्फी आदेश देत पतीचा अर्ज मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात अस्थिरता! गुंतवणूकदार सावध; कोणते शेअर्स वाढले?

Dhangar Reservation: भाजपने धनगर समाजाला भरपूर दिले: खासदार वडकुते, मुख्यमंत्री फडणवीसांचे काम कौतुकास्पद

Marathi Bandishi Project: मराठी बंदिशींचे होणार दस्तावेजीकरण; पुस्तक, दृकश्राव्य स्वरूपात जतन, मराठी भाषा विभागाचा प्रकल्प

Ebola Cases: कोरोना विसरा... आता भारताच्या दारात ‘इबोला’! बंगळूरमध्ये महिला विलगीकरणात, नागपूरमध्येही वाढली चिंता

शिवसेना आमदारांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना साकडे, पालकमंत्र्यांची दिल्लीवारी; भाजपचं नाव ठरलं पण

SCROLL FOR NEXT