In pune women Are doing Shopping at Tulsi Baug again  
पुणे

अखेर तुळशीबाग पुन्हा गजबजली; महिलांची खरेदीसाठी गर्दी पण...

समाधान काटे

पुणे : तुळशीबाग म्हटलं की, सुंदर सुंदर दागिणे, छान छान ड्रेस, साड्या, चप्पल अशी बरीचशी दुकाने अन् तरुणी महिलांची खरेदीसाठीची गर्दी, हे ठरलेलच. पण, लॉकडाऊन सुुरु झाला आणि हे चित्र दिसेनासे झाले. लॉकडाऊनच्या सुरुवातीला पुणे शहरातील पेठा बंद केल्या होत्या, त्यामध्ये तुळशीबागेतचा देखील समावेश होता. मात्र राज्य शासनाने हळुहळु लॉक डाऊन खुले करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातील तुळशीबाग देखील खुली करण्यात आली आणि आता तुळशीबाग पूर्ववत होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांचे आवडते खरेदी ठिकाण म्हणून तुळशीबाग ओळखली जाते. घरामध्ये लहान-मोठे सण असू देत किंवा इतर धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम खरेदी करण्यासाठी मात्र महिला तुळशीबागेलाच प्राधान्य देत असतात. नेहमी गर्दीने गजबजलेले तुळशीबाग लॉकडाऊन नंतर खुली करण्यात आली आहे. खुली केल्यानंतर काही प्रमाणात खरेदीसाठी नागरिक येत आहेत. बहुतांशी नागरिक सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळताना दिसतात. तसेच येथील स्टॉलधारक व व्यापाऱ्यांना सॅनीटायझर, सोशल डिस्टंसिंग, दोन स्टॉल मधील अंतर हे सक्तीचे करण्यात आले आहे

आणखी वाचा - सुप्रिया सुळेंच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध

"ग्राहकांना सक्तीने मास्क सॅनीटायझर वापरायला सांगतो. तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियमही पाळत असतो. आमच्याकडे सॅनीटायझरच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. त्या ग्राहकांना पहिल्यांदा वापरण्यासाठी देतो, दुपारनंतर अडीच ते साडेचार वाजेपर्यंत गर्दी असते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करतो"
- आनंद निमण, स्टॉलधारक, तुळशीबाग.

कोरोनाचा दणका : पुण्यात अनेकांनी रेस्टॉरंट्स, कॅफे काढली विकायला!

"भावाचं लग्न आहे म्हणून तुळशीबागेत खरेदी करायला आले. मला ज्या वस्तू हव्या होत्या त्या दुकाने बंद असल्याने बहुतांशी येथे मिळाल्या नाहीत. नागरिकांनी दुकानवाल्यांना सहकार्य करायला हवे व सोशल डिस्टन्स पाळायला हवा".
- सजेन किरवे, महिला ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Latest Marathi News Live Update : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपले

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

He Kay Navin Review: 'हे काय नवीन' मध्ये खरंच काही नवीन आहे का? कशी आहे प्रिया उमेशची नवी वेब सीरिज?

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

SCROLL FOR NEXT