विश्वात्मक संत साहित्य परिषद, पुणे sakal
पुणे

पुणे: विश्वात्मक संत साहित्य संमेलन हे ४ ते ६ एप्रिल कोल्हापूरत होणार

संत साहित्याच्या अभ्यासकांनी, विचारवंतांनी आणि सर्व नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा

सकाळ वृत्तसेवा

पुणे: विश्वात्मक संत साहित्य परिषद, पुणे आणि अमरवाणी इव्हेंट्स फाउंडेशनच्या वतनी पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन येत्या ४ ते ६ एप्रिल २०२२ या कालावधीत कोल्हापूर येथे होणार आहे. भारत सरकारच्या कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी हे संमेलनाचे अध्यक्ष तर संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे हे स्वागताध्यक्ष आहेत. अशी माहिती प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी डॉ. मदन महाराज गोसावी, प्रा. डॉ. सदानंद मोरे, डॉ. रंगनाथ नाईकडे, मोहन तिवारी, शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते. संमेलनाविषयी विस्तृत माहिती देताना डॉ. खांडगे म्हणाले, ‘‘संमेलनाचे उद्घाटन ५ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आदी उपस्थित राहणार आहेत. संमेलनामध्ये कीर्तन, भजन, भारूड व भक्तिसंगीताचा कार्यक्रमांबरोबर विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ग्रंथरूपी स्मरणिकेचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण पार पडणार आहे.’’

संत साहित्याच्या अभ्यासकांनी, विचारवंतांनी आणि सर्व नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनचे संचालक रवी पाटील, संचालक मोहन गोस्वामी (तिवारी) आणि विश्वात्मक संत साहित्य परिषदेतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

संविधानात बसेल ते मिळेल, कुणाच्या ताटातलं देणार नाही; मराठा आरक्षणावर फडणवीसांची प्रतिक्रिया, जरांगे म्हणाले, ताटच उरणार नाही

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

SCROLL FOR NEXT