Amitabh Gupta Sakal
पुणे

Yerawada Jail : कारागृह उत्पादित वस्तू लवकरच ‘ई-मार्केटप्लेस’ वर; अमिताभ गुप्ता

कारागृहातील उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेसवर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

कारागृहातील उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेसवर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.

पुणे - कारागृहातील उत्पादित वस्तू ई-मार्केटप्लेसवर लवकरच नागरिकांसाठी खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.

मकर संक्रांती सणानिमित्त उद्योग विक्री केंद्र, येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक गुप्ता यांच्या हस्ते झाले. हे प्रदर्शन व विक्री २६ जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, मुख्यालयाचे कारागृह उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव मंगल कश्यप आदी या वेळी उपस्थित होते.

गुप्ता म्हणाले, बंदीजनांना त्यांचे कलागुण, छंद कारागृहात असताना जोपासण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून दिल्यास त्यांच्याकडून विविध कल्पक गोष्टींची निर्मिती होते. बंदी कामात गुंतले गेल्याने ते कारागृहातील कालावधीत सतत व्यस्त राहतात. कायद्यानुसार बंद्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.

विविध सरकारी विभागांकडून कारागृहातील उत्पादित टेबल, खुर्ची, कपाटे, गणवेश, सतरंजी, साड्या, फाईल्स आदी वस्तूंना मोठी मागणी असते. महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत विविध जिल्ह्यांमध्ये कारागृह उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावे आयोजित करण्यात येत असतात. कारागृह उत्पादित वस्तूंची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी होणे आवश्यक असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT