पुणे

येरवडा कारागृहात घुमले देशभक्तीचे सूर

CD

पुणे, ता. १९ ः ‘ऐ मेरे वतन के लोगों’, ‘मेरे देश की धरती’, ‘तेरी मिट्टी में मर जावाँ’ अशा देशभक्तीपर गीतांचे सूर कारागृहात घुमले. निमित्त होते, महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ यांच्यातर्फे आयोजित ‘ऐ मेरे प्यारे वतन’ या संगीत मैफिलीचे.
कैद्यांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पांतर्गत कैद्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन मिळवून त्यांच्यात सकारात्मक परिवर्तन व्हावे, या उद्देशाने येरवडा मध्यवर्ती कारागृहात या मैफिलीचे आयोजन केले होते. कैद्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी गायक दीपक शहा यांच्यासह विविध कलाकार सहभागी झाले होते. याप्रसंगी अप्पर पोलिस महासंचालक डॉ. सुहास वारके यांनी कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी संयोजनात सहकार्य केलेल्या संस्थांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, विचारवंत डॉ. दत्ता गायकवाड, कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, कृष्णन श्रीनिवासन, आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवात स्पीकर निर्बंधांवर मंडळांचा आक्षेप! त्रास होणाऱ्यांना मंडळ पैसे द्यायला तयार, कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

Toll News: नवीन Highway वर आता 3 महिने टोल नाही? सरकारचा टेस्टिंग प्लॅन काय?

Marathi News Live Updates : सीएनजी रिफिलिंग पंपावर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात तिघांचा मृत्यू

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! ठेवींवरील व्याजदराबाबत बँकांना भेदभाव करता येणार नाही; एक ऑक्टोबरपासून देशभरात नवे नियम लागू

Pune News : दुबईहून दिल्लीला येत असलेला तरुण पुणे विमानतळावर बेपत्ता; विमाननगर पोलिसांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT