Yerwada Central Jail  sakal
पुणे

Pune News: येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात गँगवार; कैद्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

येरवाडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान राडा झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

पुणे शहरातील कारागृहातुन मोठी बातमी समोर आली आहे. येरवाडा कारागृहात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्व वादातून हा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी येरवाडा पोलिसांनी 16 कारागृहातील कैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

या घटनेमुळे शहरातील कारागृह कैद्यांसाठी सुरक्षीत राहिले नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, पूर्ववैमनस्यातून दगड, पत्रा घेऊन एकमेकांना मारहाण केली आहे. या हाणामारी प्रकरणात गालफोडे टोळीचा सहभाग होता. काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा झाल्यामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहीतीनुसार, येरवाडा कारागृहात वर्चस्व वादातून कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या राड्याप्रकरणी पोलिसांकडून येरवडा कारागृहातील 16 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्कल तीन जवळ असलेल्या बॅरक आठ जवळ कैद्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या घटनेमुळे काही काळ कारागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.(Latest Marathi News)

तर 2700 कैद्यांची क्षमता असणाऱ्या येरवाडा कारागृहामध्ये सध्या 9 हजारांपेक्षा अधिक कैदी आहेत. कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवल्यामुळे अनेक कैद्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. तसेच कारागृहात वारंवार मोबाईल फोन आणि इतर साहित्य मिळण्याच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.(Latest Marathi News)

मेहबूब फरीद शेख ,अनुराग परशुराम कांबळे, शुभम गणपती राठोड, रोहित चंद्रकांत जुजगर, रुपेश प्रकाश आवाडे, विशाल समाधान खरात ,आकाश उत्तम शिनगारे, सुरज प्रकाश रणदिवे, किरण रमेश गालफाडे ,गणेश वाघमारे, मुकेश सुनील साळुंखे, सचिन शंकर दळवी, विजय चंद्रकांत विरकर, प्रणव अर्जुन रणधीर आणि प्रकाश शांताराम येवले या कारागृहातील कैद्यांमध्ये तुफान राडा झाला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT