bullets fired  SAKAL
पुणे

पुणे : येरवडा कारागृहातील पोलिसाची बंदुकीतुन गोळी झाडून आत्महत्या

येरवडा कारागृहात रक्षक म्हणून कार्यरत असताना रविवारी पहाटे घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : येरवडा कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वर बंदूकीतुन गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. संबंधित कर्मचाऱ्यास या त्यांच्या सहकाऱ्यांनी उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यु झाला. ही घटना रविवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास येरवडा कारागृहामध्ये घडली.

अमोल मुरलीधर माने (वय 28, मुळ रा. नगर) असे मृत्यु झालेल्या पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माने हे मागील पाच वर्षांपासून येरवडा कारागृहात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यातच त्यांचे लग्न झाले होते. त्यासाठी ते काही दिवस सुट्टीवर होते. लग्नानंतर आठ दिवसांपुर्वीच ते पुन्हा नोकरीवर रुजु झाले होते.

त्यांना कारागृहाच्या परिसरातच गार्ड ड्युटी दिली जाते, त्यानुसार शनिवारी रात्रीही त्यांना कारागृह परिसरातच गार्ड ड्युटी देण्यात आली होती. दरम्यान, रविवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास माने यांनी त्यांच्याकडील शासकीय पिस्तुलातुन स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT