शिवाजीनगर ः मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याचा अक्षत नायक शटल परतविताना.
--------------
काळे, कुंबेफाळकर, रैनाची मानांकितांवर मात
राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा ः अली, राऊत, राजपूत, भाटिया, नायकचे विजय
पुणे, ता. ५ ः सुधांशू बॅडमिंटन अकादमी आयोजित एसबीए करंडक पंधरा व सतरा वर्षांखालील गटाच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या ईशानवी काळे, ध्रुवी कुंबेफाळकर, कायरा रैनाने मानांकित खेळाडूंवर विजय मिळविताना आपली आगेकूच कायम राखली आहे.
अन्य लढतींत मीर अली, प्रथम राऊत, मयंक राजपूत, रुहान भाटिया, अक्षत नायकने विजय मिळविले.
शिवाजीनगर येथील मॉडर्न बॅडमिंटन संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात बिगर मानांकित पुण्याच्या ईशानवी काळेने नवव्या मानांकित तेजस्वी भुतडाचा ७-१५, १८-१६, १५-१० असा पराभव करून अनपेक्षित निकालाची मालिका कायम ठेवली. एकविसाव्या मानांकित पुण्याच्या ध्रुवी कुंबेफाळकरने मुंबई शहरच्या आठव्या मानांकित रुद्र गावडेचा १५-१३, १५-८ असा, तर अठराव्या मानांकित पुण्याच्या कायरा रैनाने दहाव्या मानांकित मुंबई शहरच्या इमान मोटरवालाचा १५-५, १५-८ असा पराभव केला होता.
पंधरा वर्षांखालील मुलांच्या गटात पुण्याच्या मीर अलीने सत्ताविसाव्या मानांकित छत्रपती संभाजीनगरच्या विशेष श्रीवास्तवला १५-७, १५-१३ असे, रायगडच्या प्रथम राऊतने सोलापूरच्या श्रीआंश हुबळीकरला १५-१२, १५-६ असे, ठाण्याच्या पाचव्या मानांकित मयंक राजपूतने नागपूरच्या ओजस लांडगेला १५-१०, १५-१३ असे, मुंबई शहरच्या बाराव्या मानांकित रुहान भाटियाने पुण्याच्या मिहिर इंगळेला १५-९, १६-१४ असे, नागपूरच्या अवनीश खिरटकरने पुण्याच्या अवनीश बालचंद्रला १०-१५, १५-८, १५-१३ असे, तर पुण्याच्या अक्षत नायकने अभिवीर मलिकला १३-१५, १५-९, १५-९ असे पराभूत केले होते.
निकाल :
पंधरा वर्षांखालील मुले : वेदांत यादव (नागपूर) वि.वि. बुरहानुद्दीन अत्तरवाला (पुणे) ४-१५, १५-१२, १८-१६, मीर अली (पुणे) वि.वि. विशेष श्रीवास्तव (छत्रपती संभाजीनगर) १५-७, १५-१३; हिमांशू भाटकर (रायगड) वि.वि. कृतिक एम. (मुंबई उपनगर) १५-७, १५-६; श्रीश मिश्रा (पालघर) वि.वि. दियान पारेख (पुणे) १५-१२, ११-१५, १५-१३; हृदान पाडवे (पुणे) वि.वि. रयान शहा (मुंबई शहर) १५-६, १५-८; योहान कल्याणी (नाशिक) वि.वि. भाविक मुसळे (नागपूर) १७-१५, १५-६; अर्जुन श्रीगडीवार (पुणे) वि.वि. जयेश खेमनर (पुणे) १५-२, १५-५; प्रथम राऊत (रायगड) वि.वि. श्रीआंश हुबळीकर (सोलापूर) १५-१२, १५-६; मयंक राजपूत (ठाणे) वि.वि. ओजस लांडगे (नागपूर) १५-१०, १५-१३; रुहान भाटिया (मुंबई शहर) वि.वि. मिहिर इंगळे (पुणे) १५-९, १६-१४; अवनीश खिरटकर (नागपूर) वि.वि. अवनीश बालचंद्र (पुणे) १०-१५, १५-८, १५-१३, अक्षत नायक (पुणे) वि.वि. अभिवीर मलिक (पुणे) १३-१५, १५-९, १५-९.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.