पुणे

मोटारीत आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह

CD

पुणे, ता. ३० : सारसबागेजवळील नेहरू स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या एका मोटारीत शुक्रवारी (ता. ३०) तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. संबंधित तरुण चार दिवसांपासून बेपत्ता होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शुभ्रत बाळासाहेब बनसोडे (वय २५, रा. कवडीपाट, लोणी काळभोर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरू स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या एका मोटारीतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळविले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे कठीण झाले होते. पोलिस तपासात मृत तरुणाची ओळख पटविण्यात आली.

शुभ्रत हा २६ ऑक्टोबरला दुपारी हडपसर गाडीतळ परिसरात वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेला होता. परंतु तो घरी परतलाच नाही. याबाबत २८ ऑक्टोबरला बेपत्ता झाल्याची नोंद हडपसर पोलिस ठाण्यात केली होती. ज्या मोटारीत त्याचा मृतदेह आढळून आला, ती मोटार शुभ्रतच्या मित्राची असल्याचे निष्पन्न झाले आहे. मोटारीत काही औषधी स्वरूपाच्या गोळ्या आढळल्या असून, न्यायवैद्यक पथकाकडून त्याची तपासणी करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाच्या शरीरावर जखमा आढळून आलेल्या नाहीत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून, तीन-चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. रासायनिक विश्लेषणानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले. स्वारगेट आणि हडपसर पोलिस तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Union Diwali gift to Farmers : नेत्यांमध्ये अध्यक्षपदावरून जुंपली असतानाच 'गोकुळ'चा दूध उत्पादकांना मोठा दिलासा! दिवाळीच्या तोंडावर खात्यात जमा होणार 'इतके' रुपये

Marathi News Live Updates : जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी !

Kolhapur Sugarcane Rate Meeting Chaos : पालकमंत्र्यांसमोरच ऊस दर बैठकीत मोठा राडा! पहिल्या उचलीच्या 'त्या' आकड्यावर शेतकरी ठाम; कारखानदारांची उडाली झोप

मुंबईच्या नॅशनल क्रिकेट क्लबच्या 'टॅलेंट हंट'मधून ४५ प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंची निवड!

Dhoni ने स्मृती मानधनाला वर्ल्ड कप जिंकल्यावर WhatsApp वर केला खास मेसेज; कॅप्टनकूल म्हणाला, 'फक्त तिचाच नंबर माझ्याकडे...'

SCROLL FOR NEXT