pune sakal
पुणे

Pune : आठवड्यातून दोनच कामाचे दिवस, त्यातही अधिकारी भेटेनात; हेलपाटे मारुन नागरिक वैतागले

खडकवासला येथील भूमापन कार्यालयातील स्थिती

निलेश बोरुडे

किरकटवाडी : वारस नोंद, मोजणीबाबत तक्रार, ऑनलाईन नोंदीबाबत तक्रार किंवा इतर संबंधित कामांसाठी वारंवार हेलपाटे मारुनही खडकवासला येथील भूमापन कार्यालयातील अधिकारी भेटत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. सोमवार व गुरुवार असे आठवड्यातून दोनच दिवस कार्यालयीन कामकाजाचे असताना अधिकारी उपस्थित नसल्याने कामे रखडल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

खडकवासला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीला लागून भूमापक कार्रालय आहे. वडगाव बुद्रुक, धायरी, नऱ्हे, किरकटवाडी, नांदोशी, सणसनगर व खडकवासला या गावांतील जमिनीच्या संदर्भातील कामे येथे केली जातात. सदर ठिकाणी आठवड्यातून केवळ सोमवार व गुरुवार असे दोन दिवस नागरिकांच्या तक्रारी व नोंदींसंदर्भातील कामांसाठी ठेवण्यात आलेले आहेत. इतर दिवस मोजणीच्या कामांसाठी ठेवण्यात आलेले असल्याने कार्यालय बंद असते. ठरलेल्या दोन दिवसातही अधिकारी उपस्थित नसल्याने किंवा अवेळी येत असल्याने किरकोळ कामांसाठी अनेक वेळा चकरा माराव्या लागतात असा आरोप नागरिक करत आहेत.

" खडकवासला येथील भूमापक कार्रालय कधीही वेळेत उघडे नसते. अधिकारी कधीही वेळेत येत नाहीत त्यामुळे आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे." प्रशांत सांगळे, नागरिक खडकवासला.

"अधिकारी कधी सकाळी नऊ वाजता तर कधी सायंकाळी चार वाजता कार्यालयात येतात. कार्यालयीन कामासाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस आहेत, त्यातही अधिकारी जागेवर नसल्याने कामं होत नाहीत." किरण मते, नागरिक खडकवासला.

"मला वारस नोंद करायची आहे. येथे आलो तर ऑफिस बंद. तीन आठवड्यांपासून मी हेलपाटे मारतोय पण अधिकारी भेटले नाहीत. अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही." संतोष पोकळे, नागरिक धायरी.

"मागील आठवड्यात मी नव्हतो हे मी मान्य करतो. मी सकाळी लवकर कार्यालयात येतो. नागरिकांनी फोन न करता वेळेत यायला हवं. आज माझी तब्येत बरी नसल्याने मी लवकर निघून गेलो." बाळू गवळी, भूमापन अधिकारी, खडकवासला सजा.

"भूमी अभिलेख अधीक्षक यांना सदर बाबत लक्ष घालण्यास सांगण्यात येईल." विजय देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT