pune zilla parishad esakal
पुणे

पुणे | नामांतरण सुरुच... वेल्हे तालुका आणि मळवलीला नवी नावं!

Print

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव पुन्हा एकदा राजगड करावे आणि मावळ तालुक्यातील मळवली रेल्वे स्टेशनला कार्ला येथील एकवीरा देवीचे नाव देण्यात यावे, अशा आशयाचे नाव बदलाचे दोन स्वतंत्र ठराव पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले. मळवली हे लोवणावळ्याच्या अलिकडचे स्टेशन आहे. हे दोन्ही ठराव पुढील मंजुरीसाठी अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात येतील, अशी घोषणा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी यावेळी सभागृहात केली.

वेल्हे तालुक्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी मांडला. राजा शिवाजी ग्रामीण विकास मंडळाने याबाबतची मागणी शिवतरे यांच्याकडे केली होती. सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या ठरावास एकमुखी पाठिंबा दिला. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर केला. वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे व दिनकर धरपाळे यांनी हा ठराव मंजूर केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.

दरम्यान, मावळ तालुक्यातील कार्ला येथील एकवीरा देवी हे महाराष्ट्रातील सर्वांचे श्रद्धास्थान आहे. या तालुक्यात मळवली येथे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनला एकवीरा देवीचे नाव द्यावे, अशी मागणी करणारा ठराव जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे मांडला. या तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे केल्याचे मराठे यांनी सांगितले. त्यानंतर एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT