Datta_Zurange 
पुणे

पुणे झेडपी सदस्याची धडाकेबाज बॅटिंग; तरुणांमध्ये जोरदार चर्चा!

सकाळ वृत्तसेवा

माळशिरस (पुणे) : माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे हे माळशिरस येथील क्रिकेट सामन्यात केलेल्या बॅटिंगमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.    

आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माळशिरस येथे भुलेश्वर क्रिकेट क्लबच्यावतीने सध्या हाप पिच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस गणेश जगताप, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, सोनाली यादव, सरपंच महादेव बोरावके, ह.भ.प. लक्ष्मण महाराज यादव, एकनाथ यादव, माऊली यादव यांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी उद्घाटनापूर्वी दत्ता झुरुंगे यांनी क्रिकेट खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. माजी उपसरपंच माऊली यादव यांनी धडाकेबाज बॉलिंग केली. तितक्याच आक्रमकपणे दत्ता झुरुंगे यांनी देखील बॅटिंग करत क्रिकेट खेळाचा आनंद लुटला. गणेश जगताप, महादेव बोरावके यांना देखील यामुळे क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. या राजकीय मान्यवरांच्या या धडाकेबाज क्रिकेटची शुक्रवारी माळशिरस आणि परिसरातील तरुणांमध्ये चर्चा ऐकावयास मिळाली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य पदाच्या निवडीत भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांना विरोध केल्याने झुरुंगे चर्चेत आले होते. 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

Oldest Cities in the world : भारत नाही, तर जगातल्या 'या' 5 शहरांना मानले जाते सगळ्यात जास्त प्राचीन..11000 वर्षांपूर्वीचा वारसा

SCROLL FOR NEXT