remdesivir. 
पुणे

पुण्यातील ग्रामीण रुग्णांसाठी झेडपी खरीदणार रेमडेसिविर; आरोग्य सभापतींची माहिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची रेमडेसिविर इंजेक्शनसाठी होणारी परवड आणि त्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी आता पुणे जिल्हा परिषद रेमडेसिविर इंजेक्शनची खरेदी करणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. हे इंजेक्शन जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिले जाणार आहे. गरजू रुग्णांना मूळ किमतीत ते उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे यांनी शुक्रवारी (ता. ९) सांगितले.

शहर व जिल्ह्यात रेमडेसिविरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे रेमडेसिविरअभावी मोठे हाल होऊ लागले आहेत. त्यातच रुग्णांना बेभावाने हे इंजेक्शन खरेदी करावे लागत आहे. यातून ग्रामीण रुग्णांची मोठी आर्थिक लूट होऊ लागली आहे. हे रोखण्यासाठी आणि ग्रामीण रुग्णांना सहजासहजी हे इंजेक्शन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेने ते स्वनिधीतून खरेदी करावे आणि रुग्णांना मूळ किंमतीत उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी सभापती प्रमोद काकडे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ कोटी रुपयांच्या रेमडेसिविरची खरेदी करण्याचा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिला आहे. दरम्यान, या खरेदीच्या परवानगीसाठी सभापती काकडे आणि शरद बुट्टे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचीही भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी ही खरेदी करण्यास परवानगी दिली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav Ayurvedic Prasad: गणेशोत्सवातील प्रसादातून मज्जाधातूचे पोषण; आयुर्वेदानुसार मोदक, पंचामृत, लाडू व लाह्यांचे मेंदूवर्धक गुण

आजचे राशिभविष्य - 11 सप्टेंबर 2026

Haritalika Ritual: हरितालिका व्रताचा खरा अर्थ काय? पार्वतीच्या तपश्चर्येपासून विवाहातील प्रेम, निवड, संयम आणि नात्यांच्या संतुलनापर्यंत

Ayurvedic Treatment: ३५व्या वर्षी हाडे ठिसूळ होऊन वारंवार फ्रॅक्चर का? आयुर्वेदातून काय मदत मिळू शकते; आहार, अभ्यंग आणि उपचाराबाबत जाणून घ्या

Lucky Zodiac Signs : 10 वर्षांनंतर जुळून आला 'त्रिग्रही योग'! 11 सप्टेंबरला मिथुन, धनुसह 5 राशींना लॉटरी लागण्याची शक्यता; जुन्या गुंतवणुकीतूनही मिळणार बंपर परतावा

SCROLL FOR NEXT