pune zp teacher mrinal ganjale announced the national teacher award 2023 maharashtra education sakal
पुणे

Pune News : पुण्यातील मृणाल गांजाळे यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर’

गांजाळे या महाराष्ट्रातून यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या एकमेव शिक्षिका

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे या शाळेतील शिक्षिका मृणाल गांजाळे यांच्यासह देशातील ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

गांजाळे या महाराष्ट्रातून यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळविणाऱ्या एकमेव शिक्षिका आहेत. शिक्षण क्षेत्रातील मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येते.

राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. यंदा मंत्रालयाकडून ५० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या देशभरातील शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये, प्रमाणपत्र आणि रौप्य पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०२३-२४ मधील शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या ‘फेलोशिप’च्या गांजाळे या मानकरी ठरल्या आहेत. उपक्रमशील शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे.

‘‘पुणे जिल्ह्यातील (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पिंपळगाव, महाळुंगे येथील उपक्रमशील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय निवड समितीने गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड करत राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समिती आणि गांजाळे यांचे अभिनंदन करत आहे.’’

- सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शब्द उधार घेतो, लाव रे तो व्हिडीओ! फडणवीसांनी ठाकरे बंधूंना त्यांच्याच व्हिडीओतून दिलं उत्तर, ३ मिनिटांचा VIDEO दाखवला

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात ऐन हिवाळ्यात पावसाच्या जोरदार सरी, कमी दाबाचा पट्टा

यंदा शाळांना ४५ दिवसांची उन्हाळा सुट्टी! जानेवारी ते जूनपर्यंत ७६ दिवस विद्यार्थ्यांना सुट्ट्या; एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा

Satara News: एसटीतील सुट्या पैशांच्‍या वादाला ब्रेक; यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटे काढण्‍यास प्रतिसाद, पारदर्शकतेतही वाढ!

घरकूल लाभार्थींसाठी मोठी बातमी! घरकुलावर सौर संच बसवायला मिळणार ‘CSR’ फंड; लाभार्थींना बॅंकेतूनही घेता येणार कर्ज; घरकूल लाभार्थींना २.१० लाख अनुदान

SCROLL FOR NEXT