Pune Metro Video Viral Sakal
पुणे

पुणे तिथे काय उणे! मेट्रोला बनवलं एसटी स्टँड; हात दाखवून थांबवली मेट्रो |Pune Metro Video Viral

पुणे तिथे काय उणे असं आपण म्हणतो पण हा प्रसंग पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे तिथे काय उणे ही उक्ती आपण अनेकदा ऐकली असेल. पुणे हे अशाच आगळ्यावेगळ्या गोष्टींसाठी कायम चर्चेत असते. पुणेरी पाट्या, दुपारची झोप अन् बरंच काही... सध्या पुण्यातील एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये दोन व्यक्ती नव्याने सुरू झालेल्या मेट्रोला हात दाखवून थांबवताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या विस्तारीत स्थानकांचे उद्घाटन केले आणि पुणे मेट्रो चर्चेत आली. त्यानंतर अनेक नागरिक पुणे मेट्रोने प्रवास करू लागले आहेत. तर सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मेट्रो प्लॅटफॉर्मवर थांबून परत निघालेली असताना दोन व्यक्तींनी हात करून मेट्रो थांबवली आणि बसून गेले आहेत.

दरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घाईघाईत मेट्रो स्थानकावर येते आणि ड्रायव्हरच्या केबीनकडे जाऊन केबीनचे दार वाजवते आणि त्याला दरवाजे उघडण्याची विनंती करतो. त्यानंतर मेट्रोचे दारं उघडतात आणि व्यक्ती मेट्रोत बसतो. तर दुसरा एक व्यक्तीसुद्धा उशीर झाला असताना घाईघाईत निघालेल्या मेट्रोला हात करून दरवाजे उघडण्याची विनंती करतो आणि नंतर बसून प्रवास करतो.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत. "नशिब हात दाखवून थांबवली नाहीतर एक राईड चालवून चेक केल असती व्यवस्थित चालते का मेट्रो, पुणेकर भविष्यात विमानसुद्धा थांबवतील, पुणेकर काही करू शकतो... अगदी काहीही... आम्ही पुणेकर बुलेट ट्रेन हात दाखवून थांबवू शकतो... ही तर साधी मेट्रो आहे" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Tree Cut: पुण्यात झाडांची कत्तल! महापालिकेचा कर्मचारीच निघाला 'पुष्पा'; पू. ल. देशपांडे उद्यानात धक्कादायक प्रकार उघड

Tiger Day: जंगलाच्या ५ किमी परिसरातील १२० नागरिक बनले 'वाघ मित्र'; ॲप अन् व्हॉट्सॲप ग्रुपने सोपा केला तपास

Live Marathi News Update : भाजपची अधिकृत भूमिका अशी आहे की कोणतीही गोळीबार झालेला नाही - पात्रा

मला त्याच्यासोबत काम करायला आवडेल... कृती सेनॉनला करायचंय 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत काम; कोण आहे तो?

Online fertilizer quota crisis: ऑनलाइन खत बुकिंगचा बोजवारा : युरिया–डीएपी कोट्यामुळे बळीराजा हैराण, दुकानांत साठा असूनही फक्त एकच बॅग

SCROLL FOR NEXT