Fuel-Rate 
पुणे

#PunePollution इंधन भूक वाढता वाढे

योगिराज प्रभुणे

पुणे - लखनौ, भोपाळ, कोची आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या ज्वलनातून जितकी ऊर्जा वापरली जाते, तितक्‍या ऊर्जेचा वापर फक्त आपल्या एकट्या पुण्यात होतो. इंधनाची मागणी आणि वाहनातून होणारे प्रदूषण एकमेकांच्या हातात हात घालून शहरात वाढत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

सर्व प्रकारच्या वाहनांमधील इंधनातील दररोज वापरण्यात येणाऱ्या ऊर्जेचा अभ्यास नवी दिल्ली येथील "सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्न्मेंट'ने (सीएसई) केला आहे. त्याच्या विश्‍लेषणातून हा निष्कर्ष निघाला आहे. देशातील प्रमुख 14 शहरांमध्ये हा अभ्यास करण्यात आला. देशाची राजधानी दिल्ली, आर्थिक राजधानी मुंबई, तसेच, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद या प्रत्येक शहरांची लोकसंख्या 50 लाख ते सव्वा कोटीच्या दरम्यान आहे. या मेगासिटींमध्ये वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे पर्यायाने तेथे इंधनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाणही दर दिवसाला चार कोटी मेगा ज्यूल्सपेक्षा जास्त आहे. पुण्यासह कोची, जयपूर, अहमदाबाद, भोपाळ, विजयवाडा, चंडीगड या "मेट्रोसिटी'मध्ये लोकसंख्या 50 लाखांपेक्षा जास्त नाही. असे असूनही पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण दोन कोटी मेगा ज्यूल्सपेक्षा जास्त नोंदल्याचे निरीक्षण टिपले आहे. भोपाळ, विजयवाडा, लखनौ आणि कोची या शहरांमधील इंधनाच्या ज्वलनातून एकत्रित वापरली जाणारी ऊर्जा एकट्या पुण्यात दररोज वापरली जात आहे.

इंधनाच्या ऊर्जा वापरात पुणे सहावे
देशभरातील इंधनाची सर्वाधिक ऊर्जा वापरणाऱ्या 14 प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. दिल्ली, चेन्नई, बंगळूर, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे.

असा मोजला ऊर्जा वापर
दरदिवशी शहरात वापरल्या जाणाऱ्या इंधनातून निर्माण होणारी ऊर्जा मेगा ज्यूल्समध्ये मोजण्यात आली. त्या आधारावर हे विश्‍लेषण करण्यात आले आहे.

पुण्यातील इंधन ऊर्जेचा वापर (सर्व आकडे मेगा ज्यूल्समध्ये)
- वाहनातील इंधनातून वापरली जाणारी एकूण ऊर्जा - 23 कोटी
- दुचाकी - 12 कोटी
- मोटारी - 6 कोटी
- रिक्षा - 2 कोटी
- बस - 2 कोटी
- टॅक्‍सी - 1 कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भयानक सत्य उघड! प्राणी, वृद्ध महिला आणि स्वतःच्या मुलीलाही सोडलं नाही... नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या विकृत कृत्यांचा इतिहास समोर

Thane: ठाण्यात पाणीकपात लागू, पाणीपुरवठा महिन्यातून दोनवेळा बंद, कुठे आणि कधी?

टोळक्यानं भररस्त्यात गाठलं; काठी, कोयता आणि दगडाने तब्बल ३५ वार, सोलापुरात तरुणाला क्रूरपणे संपवलं, भयंकर कारण समोर

Latest Marathi News Live Update : समता पतसंस्थेच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता

Kabaddi: भारतीय नौदलाचा 'बंड्या मारुती' चषकावर कब्जा! भरत हुडा ठरला १ लाखाचा मानकरी; फायनलमध्ये यु.पी. योद्धाचा धुव्वा

SCROLL FOR NEXT