पुणे

#PunePollution रेल्वेचा ‘हॉर्न’ करतोय निद्रानाश...

सचिन बडे

पुणे - ‘रात्री रेल्वेच्या ‘हॉर्न’ने मी अनेकदा दचकून उठते.. अचानक झालेल्या आवाजाने खूप भीती वाटते.. रडायलाही येतं.. त्यामुळे नीट झोपही लागत नाही...  अभ्यास करताना अनेकदा रेल्वेच्या आवाजाने अभ्यासात लक्ष लागत नाही..’  हे सांगतेय इयत्ता पाचवीत शिकणारी श्रीया सूर्यवंशी!

बीटी कवडे रस्ता, सोपानबाग, हडपसर औद्योगिक वसाहत, घोरपडी आणि वानवडीचा काही भाग लोहमार्गालगत आहे. सुमारे ५० हजार नागरिक तेथे राहतात. ही वस्ती दिवसेंदिवस वाढत आहे. सोपान बागेशेजारी राहणाऱ्या श्रीयाच्या घराजवळून लोहमार्ग जातो. पूर्वी येथे रेल्वेचे फाटक होते; पण येथे उड्डाण पूल झाल्यावर ते फाटक बंद करण्यात आले. लोहमार्गाच्या दुतर्फा संरक्षक भिंतही बांधण्यात आल्या आहेत. तरी येथे रेल्वे गाड्यांकडून हॉर्न वाजवला जातो. प्रत्यक्षात, ज्या ठिकाणी फाटक नाही, त्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास बंदी आहे. या ठिकाणचे फाटक बंद केल्यानंतरही या मार्गावरून जाणाऱ्या गोवा एक्‍स्प्रेस, महालक्ष्मी एक्‍स्प्रेस, महाराष्ट्र एक्‍स्प्रेस, सह्याद्री एक्‍स्प्रेस, कोयना एक्‍स्प्रेस तसेच मालवाहतूक करणाऱ्या गाड्याही हॉर्न वाजवतात. सुमारे ५० गाड्यांची रोज येथून वाहतूक होते. त्याचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांनाच होतो. गाड्यांची वाहतूक रात्री जास्त होते. त्यामुळे लहान मुलांची झोप मोडते, काही नागरिकांचा रक्तदाब वाढतो. विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडथळे येतात. 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जीवित हानी टाळण्यासाठी गाड्यांचे हॉर्न वाजविले जातात. या ठिकाणचे फाटक बंद जरी असले, तरी नागरिक ये-जा करत असतात. त्यामुळे संबंधित ठिकाणी हॉर्न वाजविण्यात येतात. तरी देखील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन या बाबत सूचना दिल्या जातील. 
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी,  पुणे विभाग, मध्य रेल्वे

गाड्यांचा सततचा आवाज हा पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर प्रश्‍न आहे. या गाड्यांचा आवाज ७० डेसिबल ते १०० डेसिबल पर्यंत जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. 
- सुनील सूर्यवंशी, ब्रह्म बाग सोसायटी, नागरिक

या लोहमार्गावरून जाणाऱ्या गाड्या याठिकाणी सतत हॉर्न चालू ठेवतात. त्यामुळे बराचवेळ तो आवाज येत असतो. त्याचा त्रास अभ्यास करणाऱ्या मुलांवर, वयोवृद्धांवर होतो. 
- बाबूराव राणे, ज्येष्ठ नागरिक

आमची सोसायटी ही लोहमार्गाच्या अगदी जवळ आहे. रेल्वे येथून जाताना सतत हॉर्न वाजवला जातो. त्यामुळे कानांना खूप त्रास होतो. माझ्या सासू सासऱ्यांना झोपेची गोळी घेऊन झोपावे लागते. त्यामुळे त्यांची झोपमोड झाल्यानंतर त्यांना पुन्हा झोप येत नाही.
- आरती सखरानी, प्रीती प्रकाश सोसायटी, नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PKL 12: यु मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स संघांवर कोसळला दुःखाचा डोंगर! युवा सदस्स्यांच्या निधनाने प्रो कबड्डीमध्ये शोककळा

Delhi Air Pollution : दिल्ली जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर, मुंबई चौथ्या क्रमांकावर; श्वास घेणेही झाले कठीण, अहवालाने चिंता वाढवली

मोहसिन नक्वी सुधर, नाहीतर...! Asia Cup Trophy वरून बीसीसीआय आक्रमक; पाकिस्तानी नेत्याला दिला इशारा...

धक्कादायक! पहिली पत्नी असतानाही केवळ हुंड्यासाठी केला दुसरा विवाह, १५ लाख रुपये घेतले अन् आठ दिवसांत...

Mumbai News: ‘कूपर’मध्ये औषधांचा तुटवडा, रुग्णांची गैरसोय!

SCROLL FOR NEXT