Bawankule_Rupali Patil 
पुणे

बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्या बावनकुळेंना रुपाली पाटलांचा पुणेरी टोला

चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ च्या लोकसभेसाठी 'मिशन बारामती'ला सुरुवात केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना शह देण्याची योजना भाजपनं आखली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. पण मिशन बारामतीवर असलेल्या बावनकुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी पुणेरी टोला लगावला आहे. (Puneri Tola from Rupali Patil to Chandrashekhar Bawankule who spoke of winning Baramati)

रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहिली असून यातून त्यांनी बानवकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःला पक्षात उमेदवारी मिळेना आणि बारामती जिंकणार! असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे त्यांनी बानवकुळे यांना बाहुला असंही संबोधलं आहे.

काय म्हणाले होते बावनकुळे?

जेव्हा संघटना मजबूत होत असतं तेव्हा संघर्ष करण्याची ताकद निर्माण होते. त्यानंतर भलेभले गड उद्ध्वस्त होतात. हा देशाचा इतिहास आहे. गड कोणाचा नसतो, जनतेनं तो बनवलेला असतो, असं म्हणतं बावनकुळे यांनी थेट शरद पवारांना आव्हान देत मिशन बारामतीची घोषणा केली.

बावनकुळे बारामती दौऱ्यावर

चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून इथं त्यांनी काटेवाडी (बारामती) इथं आज बूथ क्रमांक २१८ समितीचा आढावा घेतला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष मजबुतीसाठी सकारात्मक विश्वास दाखवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT