Maharashtra Population Digital Watch Sakal
पुणे

पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक घड्याळ कार्यान्वित

लोकसंख्येची ताजी आकडेवारी दर्शविणारा पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक डिजीटल घड्याळ कार्यान्वित झाले.

सकाळ वृत्तसेवा

लोकसंख्येची ताजी आकडेवारी दर्शविणारा पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक डिजीटल घड्याळ कार्यान्वित झाले.

पुणे - लोकसंख्येची (Population) ताजी आकडेवारी दर्शविणारा पुण्यातील पहिले लोकसंख्या निर्देशक डिजीटल घड्याळ (Digital Watch) कार्यान्वित झाले आहे. आगरकर रस्त्यावरील गोखले राज्यशास्र व अर्थशास्त्र संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) दर्शनी भागात हे घड्याळ स्थापित करण्यात आले आहे.

शुक्रवारी केंद्र सरकारचे माजी मुख्य सांख्यिकीशास्त्रज्ञ डॉ. प्रवीण श्रीवास्तव, सांख्यिकी विभागाच्या महासंचालक डॉ. संध्या कृष्णमूर्ती, आणि कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या हस्ते घड्याळाचे उद्घाटन करण्यात आले. केंद्रसरकारच्या आरोग्य आणि बालकल्याण विभागाच्या सहकार्याने लोकसंख्या संशोधन केंद्राने हे घड्याळ स्थापित केले आहे. महाराष्ट्राबरोबरच देशातील लोकसंख्येची बदलती आकडेवारी यावर दर्शविण्यात येत आहे. देशभरात असे लोकसंख्या निर्देशक घड्याळे बसविण्यात येत आहे. गोखले इन्स्टिट्यूटमध्ये लोकसंख्या संशोधन केंद्राच्या (पीआरसी) वतीने या निमित्त दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे.

लोकसंख्या निर्देशकाचे महत्त्व -

- घड्याळाच्या माध्यमातून लोकांना लोकसंख्येची सहज आणि नियमित माहिती मिळणार

- देशातील आणि राज्यातील लोकसंख्येतील मिनिटाला होणारा बदल टिपला जाईल

- बालमृत्यू दर, एकूण प्रजनन दर आणि माता मृत्यू दरासंबंधीची माहितीसाठी उपयोग होणार

- लोकसंख्येसंबंधीची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न

घड्याळ कसे काम करते...

देशभरातील विविध संस्थांतर्फे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते. या नोंदीचा वापर करत लोकसंख्या संशोधन केंद्राच्या वतीने प्रत्येक मिनिटाला बदलणाऱ्या लोकसंख्येचा आराखडा बांधण्यात येतो. या माहितीच्या आधारेच लोकसंख्येची ताजी आकडेवारी डिजिटल पद्धतीने मांडण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT