Small intestine 
पुणे

पुण्यात राज्यातील पहिले लहान आतड्याचे प्रत्यारोपण

सकाळवृत्तसेवा

पुणे - लहान आतड्याचे राज्यातील पहिले प्रत्यारोपण शुक्रवारी पुण्यात झाले. मेंदूचे कार्य थांबलेल्या मुंबईतील महिलेने दान केलेले सहा फूट लांबीचे लहान आतड्याचे प्रत्यारोपण २७ वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यावर करण्यात डॉक्‍टरांना यश आले. लहान आतड्याच्या आजार झालेल्या या विद्यार्थ्याला जीवदान मिळाले. ज्युपिटर रुग्णालयात ही शस्त्रक्रिया केली. 

जगातील पहिले लहान आतड्याचे प्रत्यारोपण अमेरिकेत १९६७ मध्ये झाले. या अवयवाचे देशात पहिले प्रत्यारोपण नवी दिल्लीतील मेदांत रुग्णालयात यशस्वी झाले. प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. गौरव चौबळ म्हणाले, ‘‘लहान आतड्याच्या प्रत्यारोपणाचा पहिला टप्पा यशस्वी झाला. प्रत्यारोपित लहान आतड्याचा रंग आणि हालचालींच्या आधारावर हे प्रत्यारोपण यशस्वी झाल्याचे दिसते.’’

‘‘प्रत्यारोपणानंतर रुग्ण पूर्ववत होण्यासाठी किमान तीन ते चार आठवडे लागतात. रुग्ण पूर्ववत होताना प्रत्यारोपित अवयव आपल्या शरीराने न स्वीकारणे, हा सर्वांत मोठा धोका असतो. सध्या रुग्णाला बाहेरून पौष्टिक घटक दिले जात आहेत. एक आठवड्यानंतर पूर्व पचन आहार दिला जाईल. त्यानंतर बाहेरील पौष्टिक आहार कमी करण्यात येईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आहार पूर्ववत सुरू करण्यात येईल. त्यासाठी दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागेल,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

तीन महिन्यांपूर्वी ठाणे येथील रुग्ण पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार घेऊन आला. त्याच्या पोटाच्या आतड्याला गॅंगरीन झाल्याचे निदान झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL, Video: CSK विरुद्ध RCB चा सामना विराट कोहलीला सर्वात जास्त का आवडतो? म्हणाला, 'त्यांचे फॅन्स बंगळुरूत....'

Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

सत्ताधारी पक्षाचा नेता तरुणीसोबत नको त्या अवस्थेत; सापडताच कुठे पळू झालं? शेतातून....

Solapur Ambedkar Jayanti: बुद्धिजीवी भीमप्रेमींना साेलापूरात हवीय एकत्रित मिरवणूक; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव, मध्यवर्तीचा बुधवारी होणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

SCROLL FOR NEXT