हिंजवडी - एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू केल्यावर येथील शिवाजी चौकाचे चित्र. 
पुणे

#PuneTraffic आयटीयन्स ‘इन टाइम’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडीत नेहमीच्या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना अडकून पडावे लागत असे. मात्र, दोन दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या एकेरी वाहतुकीच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बुधवारी (ता. ५) आयटी कर्मचाऱ्यांना ‘इन टाइम’ कार्यालयात जाता आले. 

वाहतुकीत केलेल्या या बदलामुळे येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होत असून, कायम भेडसावणारी कोंडीची समस्या सुटू लागली आहे. या बदलाचे आयटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, यामध्ये आणखी सुधारणा करण्याची सूचना केली आहे. 

हिंजवडी परिसरात एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविण्यापूर्वी वाकडच्या पुलापर्यंत दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असत. एकेरी वाहतुकीचा प्रयोग सुरू झाल्यानंतर हा वेळ दीड तासाने कमी झाला आहे. भविष्यात यामध्ये सुधारणा होईल, तशी कोंडीची समस्या पूर्णपणे सुटणार आहे. 

पोलिसांनी केलेल्या नव्या नियोजनानुसार शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जिओमेट्रिक सर्कल चौक आणि शिवाजी चौक अशी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. नवा बदल स्वीकारण्यास काही अवधी लागणार असला तरी त्यामुळे हा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो, अशी भावना आयटीयन्सनी व्यक्‍त केली. 

स्थानिकांची अडचण 
हिंजवडीमध्ये राबविण्यात येणाऱ्या एकेरी वाहतुकीच्या प्रयोगामुळे स्थानिक नागरिकांना अडचण सहन करावी लागत आहे. २०११ मध्ये हिंजवडी परिसरातील लोकसंख्या अकरा हजार होती. आयटी कंपन्या वाढल्यामुळे या भागात अनेक गृहप्रकल्प उभे राहिल्याने सध्याची लोकसंख्या एक लाखाच्या वर गेली आहे. एकेरी वाहतुकीच्या बदलामुळे शिवाजी चौकामध्ये २०० मीटर अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना घरी जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतराचा वळसा घ्यावा लागत आहे. 

एकेरी वाहतुकीच्या प्रयोगाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी या भागातील पार्किंगची समस्या सोडवा, तुटलेले दुभाजक दुरुस्त करा, खड्डे बुजवा अशा सूचना नागरिक करत आहेत. 
- किशोर म्हसवडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक

आयटीयन्ससाठी वेळेची बचत - १.५  तास
स्थानिकांसाठी २०० मीटरसाठी वळसा - २  किमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT