Pune Traffic 
पुणे

#PuneTraffic बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांचा चाप

सकाळवृत्तसेवा

पुणे - वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक शाखेने कंबर कसली असून; गेल्या आठ महिन्यांत एकूण एक हजार ८६२ बेदरकार वाहनचालकांचे परवाने पोलिसांनी जप्त केले आहेत, तर २७९ जणांचे पासपोर्ट पोलिसांनी रोखले आहेत. याबरोबरच विरुद्ध दिशेने (नो एन्ट्री) येणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून चार तासांतच या गुन्ह्यातील पहिले दोषारोपपत्र वाहतूक शाखेच्या दत्तवाडी पोलिसांनी दाखल केले आहे.  

शहरातील रस्त्यांवरील अपघातामध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाई सुरू केली. त्यानुसार एक जानेवारीपासून वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांचे परवाने जप्त करण्यास सुरवात केली. या कारवाईत मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वाहतूक शाखेचे नियोजन विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील म्हणाले, ‘‘वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. यासाठी वाहतूक पोलिसांकडून जागृती केली जात आहे. तरीही सर्रास नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ठोस पावले उचलली आहेत.’’ 

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २७९ जणांचे पासपोर्ट पोलिसांनी रोखले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना नियमांच्या पालनाशिवाय पर्याय नाही.
- अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त, विशेष शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 500 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ विरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा; सतेज पाटील, राजू शेट्टी करणार नेतृत्व

London Wari: सातासमुद्रापार पोहोचली विठ्ठलभक्ती! लंडनहून निघाली पंढरीची वारी; प्रथमच लंडन ते पंढरपूर ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’

Nagpur: महागाई, गुन्हेगारीविरोधात ‘रास्ता रोको’; विदर्भवाद्यांचा एल्गार; पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये झटापट, १७ ताब्यात

Suryakumar Yadav: श्रेयसकडे कॅप्टन्सी जाताच सूर्यकुमार यादवचं रौद्ररूप; फक्त ३६ चेंडूंत उडवला धुरळा, वाचा नेमकं काय घडलं"

SCROLL FOR NEXT