Pune-Municipal
Pune-Municipal 
पुणे

तब्बल ४७ हजार जणांवर पुणे महापालिकेकडून दंडात्मक कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे व जाळणे, उघड्यावर शौचास बसणे अशा तब्बल ४७ हजार जणांवर पुणे महापालिकेकडून गेल्या वर्षभरात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल दीड कोटी रुपये दंड वसूल केल्याची माहिती घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्‍वर मोळक यांनी दिली.

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेने सहभाग घेतला आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, घाण केल्यास, 

लघुशंका अथवा शौचास बसणाऱ्यांना जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यांचा वापर करून महापालिकेने दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. त्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पथके तैनात केली आहेत.
शहरातील मोठ्या सोसायट्या, आस्थापना आणि शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण करणाऱ्यांनी आपल्याच परिसरात ओला व सुका कचरा जिरविण्याचे महापालिकेने आवाहन केले होते. यासाठी महापालिकेच्या वतीने प्रकल्प उभे करण्यासाठी आणि बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी अवधी देऊन जनजागृती केली होती. ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिक साहाय्य पुरविणाऱ्या विविध कंपन्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT