Face-Mask 
पुणे

विनामास्‍क फिरणारे पोलिसांच्या रडारवर; सात दिवसात केली एवढ्या पुणेकरांवर दंडाची कारवाई

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र तरीही बेफिकिरीने वागत मास्कचा वापर न करणारे नागरिक सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. गेल्या सात दिवसांत १५ हजारांहून अधिक पुणेकरांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

कोरोनाचा फैलाव संपुष्टात येईपर्यंत प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे; मात्र या आदेशाचे उल्लंघन करत मास्कशिवाय किंवा त्याचा वापर न करणाऱ्या नागरिकांना पाचशे रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दोन ते आठ सप्टेंबरदरम्यान केलेल्या कारवाईत ७६ लाख ३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मास्कसह वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांना दुहेरी दंड केला जात आहे. काही ठिकाणी तर पोलिस अगदी गल्लोगल्ली जाऊन कारवाई करत आहेत. नागरिकही पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. 

कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही, त्यामुळे मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे व सतत हात धुणे आवश्‍यक आहे. या कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून, मास्कबाबत जागरूकता वाढविणे आहे. कोविड १९ पासून बचावासाठी पुणेकरांनी आवश्‍यक ती खबरदारी घ्यावी. 
- बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) 

ऑफिसला जाण्यासाठी मी मंगळवारी मोटारीमधून जात होतो. मी मास्क लावला नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी मला थांबवून दंड वसूल केला. मोटारीमध्ये चालक एकटाच असेल व गाडीच्या काचा बंद असतील तर त्यांना दंड करू नये. 
- अशोक राऊत, नोकरदार

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT