punyabhushan diwali pahat
punyabhushan diwali pahat 
पुणे

स्वर, सूर, ताल अन्‌ नृत्याची मैफील

सकाळ वृत्तसेवा

पुणे -  लक्ष्मीपूजनाच्या पहाटे पुणेकरांचा उत्साह, रांगोळी, पणत्या, आकाशकंदिलांची नयनरम्य सजावट, अत्तराचा सुगंध, सनई-चौघडा, वासुदेव, पुणेरी पगडी परिधान केलेले कार्यकर्ते, शताब्दी साजरी करणाऱ्या संस्थांचा सत्कार आणि स्वर, सूर, ताल, लय अन्‌ नृत्याची मैफील अशा वातावरणात ‘पुण्यभूषण दिवाळी पहाट’ थाटात रंगली. रावेतकर डेव्हलपर्स, कॉसमॉस बॅंक आणि कोहिनूर ग्रुप या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.

त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशनची ही सत्ताविसावी ‘दिवाळी पहाट’ बालगंधर्व रंगमंदिरात स्वर, सूर, नृत्य अन्‌ गायनाच्या मैफलीने रंगत गेली. त्यात अमर ओक यांचे बासरीवादन, पं. विजय घाटे यांचा तबलावादन, शीतल कोलवालकर यांचे कथक नृत्य, श्रीधर पार्थसारथी यांचे मृदंगवादन, सुरंजन रघुनाथ यांचे गायन आणि श्रीराम हसबनीस यांचे हार्मोनिअमवादन झाले. अमर ओक, सागर पटोका यांनी साथसंगत केली. ‘सकाळ’ या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक  होता.

जुगलबंदी, परण, ‘बाजे मुरलीया’नंतर अमर ओक यांनी बासरीवर राग खमाज सादर केला. ‘धन्य भाव सेवा का अवसर पाया’ या भैरवीने उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मैफलीची सांगता झाली. मिलिंद कुलकर्णी यांनी या बहारदार मैफलीत खुमासदार शब्दांनी रंग भरले.

या मैफलीदरम्यान शताब्दी पूर्ण केलेल्या पुण्यातील विविध संस्थांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र जोशी (दी पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि.), शरद कुंटे (डेक्कन एज्युकेशन सोसायटी), अरुण कुदळे, दीपक कुदळे (महात्मा फुले वसतिगृह), आबेदा इनामदार (डेक्कन मुस्लिम इन्स्टिट्यूट लायब्ररी), वालचंद संचेती (कॅंप एज्युकेशन सोसायटी) यांनी सत्कार स्वीकारला. आबेदा इनामदार यांनी पुण्यभूषण फाउंडेशनच्या सांस्कृतिक उपक्रमांना एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

या प्रसंगी कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल तसेच राजेश गोयल, ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मैत्र फाउंडेशनचे धनंजय गोखले उपस्थित होते.

त्रिदल-पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले, ‘‘दिवाळी पहाट कार्यक्रमास ‘त्रिदल’ने १९९२ पासून सुरवात केली. आता विदेशातही मराठी मंडळी हा कार्यक्रम करू लागले आहेत.’’ 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. काका धर्मावत यांनी सूत्रसंचालन केले.

दिवाळीत पहाटेच्या वेळी संगीताच्या मैफली हे पुण्याचे एक वैशिष्ट्य झाले आहे. पुण्यभूषणचा ‘दिवाळी पहाट’ हा पुण्यातील पहिला दिवाळी पहाटचा उपक्रम आहे अन्‌ आम्ही त्याला जोडले गेलो आहोत, याचा मला अभिमान वाटतो.
- अमोल रावेतकर,  बांधकाम व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. अजित पवार, उदयनराजे भोसले यांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT