पुणे

पुरंदर विमानतळासाठी आता सक्तीने भूसंपादन

CD

पुणे, ता. २१ : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीची संमती न मिळाल्याने आता सक्तीचे भूसंपादन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता एमआयडीसी भूसंपादन कायद्यानुसार देण्यात येणारी १० टक्के विकसित भूखंडाची सवलत मिळणार नाही. येत्या काही दिवसांत ही जमीन ताब्यात घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
पुरंदर विमानतळासाठी कुंभारवळण, वनपुरी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी व उदाचीवाडी या सात गावांमधून एक हजार २१६ हेक्टर अर्थात तीन हजार एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने प्रति एकरी एक कोटी ६१ लाख रुपयांचा मोबदला जाहीर केला आहे. त्या व्यतिरिक्त शेतातील झाडे, विहिरी, बांधकामे यांचाही स्वतंत्र मोबदला देण्यात येत आहे. आतापर्यंत ९७ टक्के शेतकऱ्यांनी जमीन देण्यास संमती दिली असून मोबदल्याचे वाटप केल्यानंतर यापैकी ७६ टक्के जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. जमिनीच्या संपादनापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार कोटी रुपयांचा मोबदला जमा करण्यात आला आहे.
सात गावांतील ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली असल्याने प्रत्यक्ष संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. मात्र, उर्वरित ४० हेक्टर जमीन देण्यास पारगाव येथील शेतकऱ्यांनी विरोध कायम ठेवला आहे. या संदर्भात उच्च न्यायालयाने प्रकल्पाला विरोध करणारी शेतकऱ्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांनाही संपूर्ण मोबदला मिळावा, यासाठी संमती देण्याचे आवाहन केले होते. मात्र, या शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही. त्यामुळे आता ही ४० हेक्टर जमीन सक्तीने संपादित करणार असल्याचे डुडी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk: अंतराळात डेटा सेंटर, जमिनीवर एआयचा विस्तार! काय आहे एलॉन मस्क यांचा जगाला धडकी भरविणारा मास्टर प्लॅन?

आमचे हात बांधलेले नाहीत, निवडणूक प्रक्रियेत गडबड केल्यास शांत बसणार नाही, सर्वोच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी!

Soybean Farm Fire : दुष्काळात कष्टाने जगवलेले पाच एकरवरील सोयाबीन जळून खाक; जाणीवपूर्वक आग लावल्याचा शेतकऱ्याचा संशय

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

अमरावतीत पोलीस शिपायाच्या मृत्यूने खळबळ; टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी लिहिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT