Purandar-Airport sakal
पुणे

Purandra Airport : पुरंदर विमानतळाच्या अडचणी संपुष्टात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुरंदरच्या विमानतळासंदर्भात संरक्षण मंत्रालयाबरोबरच आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालकांचीही परवानगी प्राप्त झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदरच्या विमानतळासंदर्भात संरक्षण मंत्रालयाबरोबरच आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालकांचीही परवानगी प्राप्त झाली. निर्धारित ‘१ए’ या जागेसंबंधीच्या तांत्रिक अडचणी ९९ टक्के संपुष्टात आल्या असून,जमीन अधिग्रहणाचा विषयही राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येईल, अशी माहिती माहिती केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित खासदार मोहोळ यांचे पुण्यात आगमन झाले. त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाने त्यांचा वार्तालाप आयोजित केला. त्या वेळी मोहोळ म्हणाले, ‘चाळीस वर्षांनंतर पुण्यातील लोकनिर्वाचित खासदाराला थेट मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. पुणेकरांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. या जबाबदारीनेच पुढील ५० वर्षांचा विचार करीत पुण्याला सर्वोत्तम शहर बनवायचे आहे.’

पुण्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पाडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

वॅम्नीकॉमसाठी प्रयत्न

देशात सहकार विद्यापीठ करण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. मात्र पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेला (वॅम्नीकॉम) सहकार विद्यापीठाचा दर्जा देता येईल का याची चर्चा सुरु आहे. हीच संकल्पना अमलात आणणे महत्त्वाचे वाटत आहे.

मोहोळ म्हणाले,

  • राज्यात सहकाराची पाळेमुळे खोलपर्यंत रुजल्याने या क्षेत्रात खूप काम करण्याची गरज

  • राष्ट्रीय सहकारी धोरण अंतिम टप्प्यात असून ते लवकरच जाहीर होणार

  • पुणे जिल्ह्यात एकूण सहा खासदार असून त्यांची विकासासाठी मदत घेणार

  • पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी ३५ एकर जमिनीच्या अधिग्रहणासाठी प्रयत्न

  • नवीन टर्मिनलसाठी काही दिवसांत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) तुकडी दाखल होणार

  • पुणे विमानतळावरील सर्व विकासकामे पूर्ण करणार

  • राज्यातील सर्व विमानतळांचा आढावा घेणार, विस्तार आणि वाढ करणार

  • पुणेकरांसाठी १०० टक्के उपलब्ध असणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT