पुणे

पुरंदरचा ग्रामीण भाग दिवाळीतही अंधारात

CD

सासवड, ता. ९: शासनाकडून दिवाळी उत्साहात साजरी होत असताना पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भाग मात्र अंधारात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होणाऱ्या नियमित भारनियमनामुळे ऐन सणासुदीत नागरिकांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भारनियमनाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असून, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच पुरंदर उपसा सिंचन योजनेमुळे परिसरात नाग, घोणस यांसारख्या विषारी सापांचा वावर वाढल्याने ग्रामस्थ व शेतकरी दहशतीखाली आहेत. या दुहेरी समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी पुरंदर पंचायत समितीचे सदस्य माउली यादव यांनी केली आहे. त्यांनी सर्वपक्षीय नेते आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सायंकाळचे भारनियमन थांबवावे व सापांच्या धोक्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दिवाळी प्रत्येक घरात प्रकाशाची असावी, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर कोणताही अंधार नसावा आणि नागरिकांचे जीवन सुरक्षित राहावे, हीच ग्रामीण पुरंदरवासीयांची अपेक्षा असल्याचे यादव यांनी सांगितले.

सिंगल फेजवर घरगुती उपकरणांऐवजी विद्युत पंप चालविल्याने यंत्रणेवर अतिरिक्त भार येतो व वीजपुरवठा खंडित होतो. नागरिकांनी सहकार्य केल्यास अखंडित वीजपुरवठा शक्य आहे.
- धीरजकुमार गायकवाड, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, सासवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये फटाक्यांच्या पैशांवरून झालेल्या वादातून रक्तरंजित हल्ला; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT