Summer Sakal
पुणे

पुरंदर तालुक्यात झाली लाही लाही; तापमान 40.6 वर

सासवडसह पुरंदर तालुक्यातील तापमान ४०.६ अंश सेल्सिअसवर पोचले. पुरंदर तालुका डोंगरी असून सर्व बाजूने घाटमाथ्यावर यावे लागते.

श्रीकृष्ण नेवसे

सासवडसह पुरंदर तालुक्यातील तापमान ४०.६ अंश सेल्सिअसवर पोचले. पुरंदर तालुका डोंगरी असून सर्व बाजूने घाटमाथ्यावर यावे लागते.

सासवड - येथे सासवडसह पुरंदर तालुक्यातील (Purandar Tahsil) तापमान (Temperature) ४०.६ अंश सेल्सिअसवर पोचले. पुरंदर तालुका डोंगरी असून सर्व बाजूने घाटमाथ्यावर यावे लागते. त्यामुळे इतर तालुक्याच्या तुलनेत येथे हवामान (Weather) चांगले असते. परंतु तरीही उन्हामुळे यंदा प्रथमच अंगाची लाही लाही झाली आहे.

सासवडचे कमाल तापमान एप्रिल-मेमध्ये 35 ते 38 या दरम्यान असते, परंतु काल 39.9 आणि आज 40.6 तापमान झाले. तर किमान तापमान २३.२ अंशावर पोचले. या वषीॕची सर्वात जास्त तापमान नोंद आचार्य अञे वेधशाळेत झाल्याचे वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले. राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने अंगाची लाही लाही होत आहे. त्यात घाटावरच्या थंड भागातील प्रदेशात सुद्धा तापमान वाढ झाली आहे., ही गंभीर बाब आहे. या तापमान वाढीचा परिणाम पिण्याच्या पाण्याची टंचाई, उन्हाळी पिकांना चटका, फळबागांची होरपळ होण्यावर झाला आहे. सकाळी 11 ते 4 या दरम्यान बाहेर पडणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. थंड पेय, रसवंती, आईस्क्रीम, कलिंगड, रसाळ फळे यांची खरेदी वाढली आहे. परंतु वीज भारनियमन याने विविध व्यवसायांची पोळी शेकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT