Paduka Darshan Sohala 2024 Sakal
पुणे

Paduka Darshan Sohala 2024: पुण्यातून पादुका दर्शन सोहळ्यासाठी बससेवा उपलब्ध आहे का?

‘श्रीगुरू पादुकादर्शनाच्या उत्सवा’साठी नागरिकांना पुण्यातून नवी मुंबईत उपस्थित राहता यावे, यासाठी ‘पर्पल मेट्रोलिंक’ने सवलतीच्या दरात सशुल्क एसी बससेवा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Paduka Darshan Sohala 2024 : ‘श्रीगुरू पादुकादर्शनाच्या उत्सवा’साठी नागरिकांना पुण्यातून नवी मुंबईत उपस्थित राहता यावे, यासाठी ‘पर्पल मेट्रोलिंक’ने सवलतीच्या दरात सशुल्क एसी बससेवा उपलब्ध करून दिली आहे.

मंगळवार (ता. २६) आणि बुधवारी (ता. २७) ही सेवा पुणे शहरातून उपलब्ध असेल. त्यामुळे नागरिकांना श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेऊन पुण्यात वेळेत परतणे शक्य होणार आहे. या दोन दिवसांच्या उत्सवात सहभाग घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून नागरिकांना येणार आहेत. तसेच पुण्यातूनही विविध मंदिरांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, भजनी मंडळ, कीर्तनकार आदी विविध स्तरांतील नागरिक दर्शनासाठी नवी मुंबईत जाणार आहेत.

ज्या नागरिकांकडे वाहन व्यवस्था नाही, त्यांच्यासाठी ‘पर्पल मेट्रोलिंक’तर्फे बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुण्यातून बस वाशी प्लाझा येथे नागरिकांना सोडेल. तेथून सिडको एक्झिबिशन सेंटर अगदी जवळच आहे.

हे लक्षात ठेवा

- कधी - २६ आणि २७ मार्च रोजी

- वेळ - पुण्यातून सकाळी सात वाजल्यापासून दर तासाला, नवी मुंबईतून पुण्यात येण्यासाठी रात्री आठपर्यंत

- शुल्क - जाऊन- येऊन प्रतिमाणशी ५०० रुपये भाडे

- पुण्यातून कोठून बस सुटणार - स्वारगेट (मित्रमंडळ चौक), कोथरूड (मोरे विद्यालयापासून), वाकड (शनी मंदिराजवळ, इंदिरा कॉलेज समोर)

- वाशीहून कोठून बस सुटणार - वाशी प्लाझापासून

- बस प्रवासासाठी संपर्क - पर्पल मेट्रोलिंक (कोथरूड ऑफिस) - ९११२४४७४७४, ०२०- २५४४२६४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

Cameron Green: काल आयपीएल लिलावात २५.२० कोटी मिळाले अन् आज पठ्ठ्या भोपळ्यावर बाद झाला... KKR ला फसल्यासारखं झालं...

Viral Video: 'सर, हेल्मेट है, फिट नही आता', वृद्ध दुचाकीस्वाराचं उत्तर ऐकून सोशल मीडियावर कौतुकाचा पाऊस

Kolhapur Forest Incident : बंदुका, सर्च लाईट, दोरी; शिकारींचा जंगलात रात्रीस खेळ चाले, वन विभागाने थरारकरित्या पाठलाग केला अन्

Latest Marathi News Live Update : वांद्रे–वरळी सी लिंकवर थरारक ड्रायव्हिंग, 250 किमी प्रतितास वेगाने कार चालवणाऱ्याविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT