purse found at road of wagholi pune returned to the woman 
पुणे

चालकाचा प्रामाणिकपणा; तीन लाखांचा ऐवज असलेली पर्स केली परत

नीलेश कांकरिया

वाघोली : वाघोलीतील वाघेश्वर चौकात सापडलेली पर्स त्यातील आठ तोळे सोन्याचे दागिने व रोख 20 हजार रुपये तुकाराम सलगर या चालकाने त्या महिलेच्या नातेवाईकांना परत केली. आजच्या सोन्याचा दराचा विचार करता तीन लाख रुपयांचा हा ऐवज होता. पर्स मिळाल्याने यादव कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे. त्यांनी सलगर यांचे आभार मानले आहेत.

मेघा यादव या मुलीला भेटण्यासाठी वाघोलीत आल्या होत्या. प्रवासात त्यांची पर्स वाघेश्वर चौकात पडली. उशिराने त्यांच्या ही बाब लक्षात आली. दरम्यान, सलगर हे त्या चौकातून दुचाकीवर जात होते. त्यांना ही पर्स दिसली. त्यांनी ती  ताब्यात घेतली. त्यात मोबाईल होता. तो सतत खणखणत होता. त्यांनी आपले घर मालक घनश्याम सातव यांना हा प्रकार सांगितला. सातव यांनी त्या मोबाइलद्वारे यादव यांचे नातेवाईक सीमा यादव व आनंद यादव यांच्याशी संपर्क साधला.

सीमा यादव यांची ओळख पटवून सातव व सलगर यांनी पर्स ऐवजासह यादव यांना परत केली. सलगर यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक परिसरात होत आहे. सलगर हे खाजगी कंपनीतील वाहनांवर चालक म्हणून काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT