the purse theft in marriage in pune 
पुणे

मुलाच्या साखरपुड्यातील मानपान आईला पडला 17 हजारांना!

सकाळवृत्तसेवा

पुणे : लग्न सोहळा किंवा त्याआधी होणा-या कार्यक्रमांत मानपान करणे हा पाहुण्यांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा ठरतो. मानपान केलाच नाही किंवा तो कार्यक्रम संपल्यानंतर केला तर फुगलेल्या पाहुण्याची नाराजी दूर करण्यात कार्यमालकाची दमछाक होते. पण मान-अपमान बाजूला ठेवत पाहुण्यांचे मन राखण्यासाठी साखरपुड्याच्या कार्यक्रमातील सत्कार स्वीकारणे दत्तवाडी येथील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

मुलाच्या साखरपुड्यातच महिलेची पर्स चोरीला गेली आहे. संबंधित महिलेला सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर बोलविण्यात आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडील पर्स मुलाकडे दिली. त्याने ती पर्स शेजारच्या खुर्चीवर ठेवली. चोरट्यांनी त्याच संधीचा फायदा घेत ती पर्स लांबवली. पर्समध्ये एक मोबाईल, रोख रक्कम आणि इतर वस्तू होत्या. त्याची एकूण किंमत 17 हजार रुपये आहे. बाणेरमधील रॉयल कोर्ट, बॅक्वीटमध्ये शनिवारी (ता. 26) ही घटना घडली. या प्रकरणी संबंधित महिलेच्या 32 वर्षीय मुलाने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या आईसह बॅक्वीटमध्ये मोठ्या भावाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी फिर्यादी यांची आई सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर गेली चोरट्यांनी त्यांची खुर्चीवर ठेवलेली पर्स चोरून 17 हजारांवर डल्ला मारला. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक अनिल जाधव करीत आहेत.

फिर्यादी यांच्या लहान भावाच्या साखरपुड्यातच ही चोरीची घटना घडली. हॉलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही चोरट्यांचा शोध घेत आहोत, अशी माहिती जाधव यांनी दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dry Day: होळी, मोहरम आणि गांधीजयंती दिनी दारूची दुकाने उघडण्यास परवानगी; राज्य सरकारचा निर्णय, उत्पादन शुल्क धोरणात बदल

'सैराट'मधून किती पैसे मिळाले? रिंकूने असं काय म्हटलं की होतेय ट्रोल? वाचून तूम्हीही म्हणाल- काहीही हा श्री

Igatpuri News : सावधान! तुम्ही खात असलेली कुल्फी 'विष' तर नाही? इगतपुरीत बनावट कुल्फी कारखान्याचा पर्दाफाश

Ramadan Moon Sighting Rules : इस्लाममध्ये रमजान पवित्र का मानला जातो? 'या' पाच स्तंभांना का आहे महत्त्व?

Gas and Headache: गॅस डोक्यात जातो का? ‘या’ 4 लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT